all artist blind new experiment in Marathi film drishtant singers musicians dubbing artists blind
all artist blind new experiment in Marathi film drishtant singers musicians dubbing artists blind 
मनोरंजन

निर्माते, दिग्दर्शक सोडून सगळे 'दृष्टिहीन'; 'दृष्टांत' ची उत्सुकता कायम 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  असा एक चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे ज्यात काम केलेले सर्व कलाकार हे दिव्यांग आहेत. केवळ अभिनय करणारेच नाहीत तर संगीतकार, डबींग करणारे कलाकार दृष्टिहीन आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरताना दिसत आहे. यापूर्वी असा प्रयोग मराठी वा हिंदी चित्रपटसृष्टीत झाल्याचे ऐकिवात नाही. दुष्टिहीन यांना घेऊन चित्रपट तयार केले गेले आहेत. तसेच बॉलीवूड किंवा मराठीतील अनेक कलाकारांनी त्या भूमिकेत काम केले आहे. आता नव्यानं प्रेक्षकांसमोर येणारा 'दृष्टांत' नावाचा चित्रपट ख-या अर्थानं वेगळ्या प्रकारातला आहे. त्याच्याविषयी कमालीची उत्कंठा प्रेक्षकांना आहे. असा चित्रपट कशाप्रकारे तयार केला गेला असेल हा खरा प्रश्न आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा प्रयोग म्हणून अशाप्रकारची कलाकृती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तो सगळ्यांसाठी नवलाईचा विषय आहे. केवळ गल्लाभरु चित्रपट तयार करणे एवढीच मराठी चित्रपटांची ओळख नाही. तर एखादा वेगळा विषय घेऊन त्यावर संशोधन करुन, सर्वांगान त्याचा विचार करुन त्याची प्रभावी मांडणी करण्याचे प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीनं केले आहेत. त्याला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला आहे. त्या प्रयोगांना जागतिक स्तरावरही चांगली पसंती मिळाली आहे. पुरस्कारांचा मान प्राप्त झाला आहे.

एका वेगळ्या मांडणीचा प्रयोग म्हणून या नव्या चित्रपटाकडे पाहता येणार आहे. त्या चित्रपटाचे नाव दृष्टांत असे आहे. ‘दृष्टांत’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.  या चित्रपटातील कलाकार हे त्यांच्या ख-या आयुष्यात दृष्टिहीन असून त्यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. फक्त अभिनेतेच नव्हे तर गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन असून या चित्रपटाचे भाग आहेत. बीएम प्रॉडक्शन्स आणि पोलराइड मीडिया निर्मित, त्रिपुर सिंग, तन्मय तेलंग आणि हर्षवर्धन हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

अभिजित के. झांजल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यामध्ये झाले असून, मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा कलाकार अजिंक्य याभोवती चित्रपटाची मुख्य कथा आधारित आहे. या चित्रपटात बबिता, रतन आणि योगेश राव या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT