Marathi film EKADA YEUN TAR BAGHA Despite the limited release performs amazingly well SAKAL
मनोरंजन

Ekda Yeun Tar Bagha: थिएटर कमी मिळूनही 'एकदा येऊन तर बघा'ची बॉक्स ऑफीसवर विक्रमी कमाई

'एकदा येऊन तर बघा'ने बॉक्स ऑफीसवर विक्रमी कमाई केलीय

Devendra Jadhav

Ekda Yeun Tar Bagha Box Office Collection News: गेल्या अनेक दिवसांपासुन मराठी मनोरंजन विश्वात विविध सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. २०२३ मध्ये वेड, वाळवी, बाईपण भारी देवा, आत्मपॅफ्लेट आणि नुकताच रिलीज झालेला झिम्मा 2 अशा सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

अशातच काल ८ डिसेंबरला एकदा येऊन तर बघा एकदा येऊन तर बघा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. थिएटर कमी मिळूनही सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असल्याचं दिसतंय. जाणून घ्या.

'एकदा येऊन तर बघा'ची विक्रमी कमाई

'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 90.69 लाख रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे विभाजन खालीलप्रमाणे आहे:

मुंबई : रु.35.19 लाख

मराठवाडा : रु.09.47 लाख.

संपूर्ण महाराष्ट्र : रु. ४६.०३ लाख

प्रवीण दरेकर यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला मुद्दा

आमदार प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपुर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 'एकदा येऊन तर बघा' सिनेमाला थिएटर मिळत नसल्याचा मुद्दा मांडला. दरेकर म्हणाले, "बोरीवलीमध्ये प्रसाद खांडेकर नावाचे कलाकार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे ते लोकप्रिय आहेत. त्यांचा आगामी सिनेमा एकदा येऊन तर बघा रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. पण इंडस्ट्रीतले काही बॉस - दादा लोकं आहेत, जे सिनेमाला थिएटर मिळू जेत नाहीत. प्रसाद हा मराठी तरुण सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं.

देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

प्रवीण दरेकरांनी मुद्दा उपस्थित केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्रसाद खांडेकर हा अतिशय गुणी कलावंत आहे. हास्यजत्रेच्या माध्यमातुन सातत्याने तो लोकांचं मनोरंजन करत आहे. जर त्याच्या मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायगेशीर कारवाई केली जाईल, असं फडणवीसांनी आश्वासन दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT