Producer Rohan Godambe 
मनोरंजन

निर्माते रोहन गोडांबे यांच्या जिद्दीचा अनोखा प्रवास

रोहन गोडांबे यांची गोष्ट ही चित्रपटातल्या नायकासारखी आहे.

स्वाती वेमूल

केवळ छंद किंवा हौस म्हणून काम करणारे आणि त्या हौसेचे संधीत रूपांतर करणारे फार क्वचित असतात. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आवड आणि जिद्द या बळावर कार्यकारी निर्माता ते निर्माता असा आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू करणारे रोहन गोडांबे (Rohan Godambe) यांची गोष्ट ही चित्रपटातल्या नायकासारखी आहे. शालेय जीवनापासून कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या गुरुतुल्य व्यक्तींच्या सानिध्यात कलेचे धड़े गिरवत आपला प्रवास करणाऱ्या रोहन यांना अभिनयापेक्षा बॅकस्टेज सांभाळण्याची कसरत अधिक आवडू लागली. या आवडीतून त्यांचा चित्रपटसृष्टीत श्रीगणेशा झाला. रोहन गोडांबे यांनी आपली क्षमता, आपले प्रयत्न यांतून आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू केला.

सगळी व्यवधान सांभाळून व्यवस्थापनेचे कौशल्य दाखविणाऱ्या आईप्रमाणे कार्यकारी निर्मात्यालाही चित्रपटरूपी गोंडस बाळाची काळजी घ्यायची असते. चित्रपटाच्या घोषणेपासून ते प्रदर्शनापर्यंत कार्यकारी निर्मात्याची भूमिका अहम ठरते. जिद्द आणि 'पुढे जायचं' ही इच्छा धरून रोहन गोडांबे यांनी आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू केला. या प्रवासात बिपीन नाडकर्णी यांचे मार्गदर्शन अतिशय मोलाचे ठरले. मिळालेल्या संधीचं सोनं करत आज इंडस्ट्रीत रोहन गोडांबे हे नाव होताना दिसतंय.

लाइन प्रोडयुसर, कार्यकारी निर्माता ते निर्माता हा त्यांचा प्रवास थकक करणारा आहे. २२ वर्षे इंडस्ट्रीत प्रचंड काम केल्यानंतर आलेल्या अनुभवातून त्यांनी स्वत:च्या ‘असमथी प्रोडक्शन्स’ या निर्मीती संस्थेअंतर्गत काही वेबसिरीज आणि मराठी चित्रपटांच्या निर्मीतीची धुरा उचलली आहे. लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येइल. चित्रपटसृष्टीत तसा कोणताही गॉडफादर नसताना रोहन गोडांबे यांनी आपल्या मार्गदर्शकांची साथ, घरच्यांचा पाठींबा आणि जिद्दीच्या जोरावर चित्रपटनिर्मितीच्या स्वप्नाची मजल गाठली आहे.

‘उत्तरायण’ ‘एवढंस आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक ‘पालक’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘यलो’, ’न्यूड’, ‘डोक्याला शॉट’, विकून टाक, अलीकडचा ‘बीटरस्वीट’ या दर्जेदार मराठी चित्रपटांसोबत झोया अख्तर दिग्दर्शित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘किरण राव दिग्दर्शित ‘धोबी घाट’ आंतरराष्ट्रीय फिल्म ‘नोरा’ यासारख्या चित्रपटांच्या कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ‘अॅड’वर्ल्ड मध्येही त्यांनी बरचं काम केलं आहे.

आपल्या प्रवासाबद्दल बोलताना रोहन सांगतात की, ‘गुणात्मकता आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे. हिंदी चित्रपटसृष्टीची काम करण्याची शिस्त, त्यांचे नियोजन या सगळ्या गोष्टी आत्मसात करून खूप काही शिकता आलं. माझ्या प्रत्येक कामातल्या अनुभवातून काही ना काही शिकायला मिळालं. सुंदर प्रवास होता हा. मला तर वाटतं की, प्रत्येक चित्रपट हाच एक टर्निंग पॉइंट होता. ही सगळी शिदोरी घेऊन माझ्या निर्मीतीची पुढची वाटचाल मी पार करत प्रेक्षकांना वेगळं काहीतरी चांगल देणार हे नक्की.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT