Ananya Movie review
Ananya Movie review esakal
मनोरंजन

Ananya Review: अनन्याच्या जिद्दीची 'प्रेरणादायी कथा'!

संतोष भिंगार्डे

Marathi Movie News: प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येत असतात. अशा प्रसंगाच्या वेळी कधी कधी आपण मनाने खचून जात असतो...कधी कधी आपल्याला निराशेने घेरले जाते. परंतु अशा अवघड आणि कठीण परिस्थितीमध्ये (Marathi Actress Hruta Durgule) जिद्दीने व तेवढ्याच आत्मविश्वासाने कसे उभे राहावे...आपल्यावर आलेल्या प्रसंगातून मार्ग काढीत पुन्हा तेवढ्याच आत्मविश्वासाने कशी भरारी घ्यावी याची कथा म्हणजे अनन्या चित्रपट. “शक्य आहे, तुम्ही ठरवाल ते शक्य आहे.” या चित्रपटात हा मांडण्यात आलेला विचार खूप (Marathi Entertainment News) काही सांगणारा आणि प्रेरणा देणारा असाच आहे. लेखक व दिग्दर्शक प्रताप फड आणि त्यांच्या टीमने अनन्या या नाटकावरून बनविलेला चित्रपट आशादायी आणि प्रेरणादायी असाच आहे. ही कथा आहे.

अनन्या नावाच्या एका जिद्दी आणि अत्यंत हुशार मुलीची. अनन्या देशमुख ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. ती आपले वडील (योगेश सोमण) आणि भाऊ (सुव्रत जोशी) यांच्याबरोबर राहात असते. वडील सरकारी नोकरीत काम करीत असतात तर भाऊ एमबीए झालेला असतो. परंतु तो बेरोजगार असतो. कित्येक ठिकाणीप्रयत्न करूनही त्याला नोकरी मिळत नाही. अनन्याची जीवश्च कंठश्च मैत्रीण असते प्रियांका (ऋचा आपटे). अनन्याची स्वतःची काही स्वप्ने असतात. तिला सीए व्हायचं असतं. परंतु त्याचदरम्यान तिचे वडील तिच्यासाठी शेखर सरपोतदार (चेतन चिटणीस) नावाच्या मुलाचे एक मोठ्या कुटुंबातील स्थळ आणतात. त्यानुसार अनन्या व शेखर यांची अॅगेजमेंट होते.

एके दिवशी अनन्या आणि शेखर लाँग ड्राईव्हला जायचे ठरवितात. अनन्याची आवडत्या सायकलीवरून ते दोघे लाँग ड्राईव्हला जात असतात आणि त्याच वेळी एक मोठी दुर्घटना घडते. या दुर्घटनेचा मानसिक जबरदस्त धक्का अनन्याला बसतो. मग त्या धक्क्यातून अनन्या कशी सावरते...ती जिद्दीने पुन्हा कशी उभी राहते...या मानसिक धक्क्याच्या वेळी तिला कोण आणि कशी मदत करते....तिच्या अॅगेजमेंटचे पुढे काय होते...अशी एकूणच अनन्याच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात आहे. दिग्दर्शक प्रताप फड यांनी अनन्याच्या संघर्षाची ही कथा मांडताना वडील आणि मुलगी, भाऊ आणि बहीण, तसेच जीवलग मैत्रीण या नात्यांमधील विविध भावनिक बंध छान गुंफलेले आहेत.

भावाचे बहिणीवर असलेले निरातिशय प्रेम तसेच एका प्रसंगात त्याच्यातील जागी झालेली स्वार्थी वृत्ती, वडिलांचे मुलीवरील प्रेम आणि तिच्याबाबतीतील त्यांची चिंता, मैत्रिणीचे अनन्यावर असलेले जीवापाड प्रेम आणि एका दुर्घटनेमुळे अनन्याच्या पदरी आलेली हतबलता...त्यानंतर तिच्यामध्ये निर्माण होणारा आत्मविश्वास दिग्दर्शक प्रताप फड यांनी या बारीकसारीक बाबी छान गुंफल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट भावनिकदृष्टा खिळवून ठेवणारा असाच झाला आहे. प्रियांका आणि अनन्या यांच्यातील मैत्रीचा धागा छान गुंफण्यात आाला आहे.

मध्यांतरानंतर होणाऱ्या जय दीक्षितच्या (अमेय वाघ) एन्ट्रीमुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढतेच शिवाय सुरुवातीला संवेदनशील आणि गंभीरपणे वाटचाल करणारा हा चित्रपट हसतखेळत पुढे सरकतो. अभिनेत्री हृता दुर्गुळे, योगेश सोमण, सुवृत्त जोशी, अमेय वाघ, ऋचा आपटे, सुनील अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार अशा सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. हृता दुर्गळेने अनन्याच्या भूमिकेकरिता खूप मेहनत घेतली आहे आणि चित्रपट पाहताना ती नक्कीच जाणवते. अनन्याची तिने साकारलेली ही अवघड भूमिका पाहता तिच्या गळ्यात पुढील वर्षी कौतुकरूपी पुरस्कारांची माळ पडायला काहीच हरकत नाही. विशेष म्हणजे ऋचा आपटे या अभिनेत्रीचेदेखील कौतुक करावे लागेल. प्रियांकाची तिने साकारलेली भूमिका दमदार आहेच शिवाय मैत्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिची भूमिका.

जय दीक्षितच्या भूमिकेमुळे चित्रपट काहीसा हलकाफुलका झाला आहे. चित्रपटातील संगीत आणि सिनेमॅटोग्राफी छान झाली आहे. मात्र चित्रपटात काही त्रुटी नक्कीच आहेत. चित्रपटाचा पूर्वार्ध खिळवून ठेवणारा झाला असला तरी मध्यांतरानंतर चित्रपट काहीसा ताणलेला वाटतो. चित्रपटातील काही बाबी अतार्किक आहेत. परंतु एकूणच अनन्याच्या संघर्षाची, तिच्या जिद्दीची ही कथा नक्कीच पाहण्यासारखी आहे.

चित्रपटाचे नाव - अनन्या

दिग्दर्शक - प्रताप फड

कलाकार - योगेश सोमण, सुव्रत जोशी, ऋचा आपटे, ह्रता दुर्गुळे

रेटिंग - ***1/2

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT