Marathi Movie Dharmaveer Mukkam post  esakal
मनोरंजन

Box Office: 'धर्मवीर' चा दणका! पहिल्या आठवड्यात 13.87 कोटींची कमाई

प्रख्यात दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Marathi Movie: प्रख्यात दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. गेल्या (Marathi Entertainment News) आठवडयात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. तब्बल चारशेहुन अधिक चित्रपटगृहे आणि (Box Office) १० हजारांहून अधिक शोज् सह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले. याच दिवशी हिंदीतील मोठ्या निर्मितीसंस्थेचे आणि तगडी स्टारकास्ट असलेले चित्रपट प्रदर्शित झाले होते. परंतु धर्मवीर पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अगदी पहिल्याच दिवसापासून धर्मवीरची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. 'धर्मवीर'ने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींचं बॉक्सऑफिस कॅलेक्शन गाठलंय. केवळ ठाण्यानेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राने 'धर्मवीरांचा जय महाराष्ट्र' प्रेमानं स्वीकारलाय.

हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण 'धर्मवीर' ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहेच. मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या काही दिवसांत लोकप्रियतेचे आणि कमाईचे नवे शिखर गाठेल असा अंदाज सिनेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

याप्रसंगी झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख म्हणाले, "मराठी चित्रपटासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. 'धर्मवीर' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींची कमाई केली आहे. आपण नेहमी ऐकतो, मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत पण सिनेमा दर्जेदार असेल तर सिनेमागृहांकडून समोरून विचारणा होते. आम्ही ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त शोज् सध्या सुरु आहेत. सिनेमा चांगला असेल तर प्रेक्षकसुद्धा तो सिनेमा डोक्यावर घेतात आणि याचं उत्तम उदाहरण 'धर्मवीर' आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT