Marathi Movie Dhurla will be release on 3 January  
मनोरंजन

3 जानेवारीला उडणार 'धुरळा'

सकाळ वृत्तसेवा

वर्षातला पहिला मराठी आणि भव्य सिनेमा

2019चं वर्ष महाराष्ट्रासाठी दोन निवडणूकांमुळे 'धुरळा'दार वर्ष होतं. निवडणूका झाल्या, सरकारं आली, जशी आली तशी कोसळली पण, पुन्हा नवीन सरकार आलं, आणि नाट्यावर पडदा पडला. पण, आता तेच  #पुन्हानिवडणूक? सत्ताकारण घेऊन नव्या वर्षात धुरळा प्रेक्षकांच्या भेटीसाठी तयार झालाय.  

मागील दिवसांत #पुन्हानिवडणूक? या हॅशटॅगने सर्व कलाकारांनी ट्विट करत जबरदस्त धुरळा सोशल मिडीयावर उडवून दिला होता. अर्थात त्याचे पडसाद वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरही दिसले. नेमकी आता पुन्हा कोणती निवडणूक या सस्पेंसमध्ये अडकलेल्या प्रेक्षकांच्या भेटीला धुरळाचा टिजर आला आणि तुफान गाजला. त्याहून जास्त गाजत आहे तो धुरळाचा ट्रेलर. लाखो व्ह्यूज मिळवणाऱ्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचल्याची प्रतिक्रिया सोशल मिडीयावरील पोस्ट्समुळे लक्षात येत आहे. 

मराठीत क्वचितच, राजकारण, सत्ताकारणाचा विषय, तगडी मल्टीस्टारर फिल्म, ठसकेबाज वन लायनर डायलॉग्ज आणि भव्यतेने भरलेला, बिग बजेट सिनेमा असं अफलातून धुरळा उडवणारं समीकरण येतं. धुरळा हा निश्चितच नव्या दशकासाठीचा मराठी सिनेमातला ट्रेंडसेटर ठरेल असे मत अनेक सिनेतज्ञांनी व्यक्त केले आहे. 

राजकारणाप्रमाणेच धुरळाच्या गोष्टीत सुध्दा बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत हे नक्की. सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय आणि दमदार डायलॉग्जची झलक ट्रेलरमधून पहायला मिळालीच आहे. खूप वर्षांनी एक दमदार राजकारणपट येतोय म्हणजे थेटरात धुरळा उडणार हे निश्चितच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पुण्यात बोगस मतदानाचा अजब प्रकार, मतदान केंद्रावर महिला न येतच तिच्या नावाने कोणीतरी दुसरच करून गेलं मतदान

Municipal Election Result: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी कधी सुरू होणार? सर्वात जलद निकाल कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

पुन्हा एकदा स्त्रियांवरच सिनेमा का केला? केदार शिंदेंचं ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' बद्दल स्पष्ट भाष्य

Rail Tour Package: भाविकांसाठी खुशखबर! आता फक्त १३ हजारांत श्रीशैलम दर्शन; जाणून घ्या रेल्वे टूर पॅकेज

Sindhudurg ZP : जिल्हा परिषद निवडणुकीत देवगडात मोठी चुरस; आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलली

SCROLL FOR NEXT