marathi movie hambirrao fame actor sunil palwal comment on struggle in bollywood in sakal exclusive interview
marathi movie hambirrao fame actor sunil palwal comment on struggle in bollywood in sakal exclusive interview sakal
मनोरंजन

बॉलीवूड मध्ये काम मिळवताना.. 'हंबीरराव'मधील अभिनेत्याने सांगितले 'ते' सत्य

नीलेश अडसूळ

hambirrao marathi movie : बॉलीवुड मध्ये काम मिळवणं सोप्पं नाही. कारण लाखों तरुण दरवर्षी देशभरातून मुंबई मध्ये बॉलीवुड मध्ये काम मिळवण्याचं स्वप्न घेऊन येत असतात. त्यात मोठ्या कलाकारांच्या मुलांना कायमच प्राधान्य मिळत असल्याने नशीब अजमावून पाहण्या शिवाय या तरुण कलाकारांकडे पर्याय उरत नाही. ते करत असताना अनेकदा काही कटू अनुभवही कलाकारांच्या वाट्याला येतात. याविषयीच हंबीरराव चित्रपटातील एक तरुण अभिनेता सुनील पलवल 'सकाळ ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत बोलला आहे.

(actor sunil palwal struggle in bollywood)

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचे पहिले सरसेनापती होते शूर-पराक्रमी हंबीरराव मोहिते! त्या पराक्रमी हंबीररावांची शौर्यगाथा म्हणजेच ‘सरसेनापती हंबीरराव’. हा प्रवीण तरडे (pravin tarde) दिग्दर्शित मराठी चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटात एक भूमिका लक्षणीय ठरली ती म्हणजे 'बहादूर खान.' (sunil palwal as bahadur khan in hambirrao) ही भूमिका हिंदीतील 'सुनील पलवल' (sunil palwal) या अमराठी अभिनेत्याने साकारली होती. या अभिनेत्या बॉलीवुड मध्ये काम मिळवताना आलेले अनुभव शेयर केले आहेत. (marathi movie hambirrao fame actor sunil palwal comment on struggle in bollywood in sakal exclusive interview)

सुनील म्हणतो, 'हिंदीमध्ये काम मिळवणे हे अत्यंत कठीण आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूट मधून शिकून येता तेव्हा लोकांच्या नजरा काहीशा सकारात्मक असतात. पण लगेच काम मिळेल याची शास्वती नसते. कारण लाखो कलाकार आपल्या सोबत रांगेत उभे असतात. त्यामुळे ऑडिशन देणे आणि आपली प्रोफाइल लोकांपर्यंत पोहोचवणे एवढेच आपल्या जातात असते. १०० ऑडिशन जेव्हा देतो तेव्हा एकदा आपलं सिलेक्शन होतं. बऱ्याचदा आपल्याला सिलेक्ट करून पुन्हा रिजेक्ट केलं जातं. त्याची कारणं तुम्हाला कळत नाही. त्यामुळे मिळालेल्या कामातून ओळख बनवणं एवढंच तुमच्या हातात आहे. यश कधी मिळेल याची शाश्वती इथे नसते.'

पुढे त्याने चित्रपटात काम करूनही जेव्हा आपले सीन वगळले जातात, त्याविषयी भाष्य केले आहे. तो म्हणतो, 'याही पेक्षा भीषण म्हणजे तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करता, आयुष्याची एक दोन वर्षे त्याला देता आणि तो चित्रपट प्रदर्शितच होत नाही. किंवा त्यातून तुमची भूमिका वगळलेली असते. तेव्हा मोठा मानसिक धक्का बसतो. कारण तुम्ही त्यात जीव तोडून काम केलेलं असतं, तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचेल याची तुम्ही वाट पाहत असता. पण जेव्हा तुमचे प्रोजेक्ट रॅलीज होत नाही तेव्हा अक्षरशः नैराश्य येतं. माझ्याबाबतीत हे झालेलं आहे. एका चित्रपटासाठी मी दोन वर्षे मेहनत घेतली, त्याच्यासाठी इतर प्रोजेक्ट नाकारले पण नंतर तो प्रोजेक्टच यशस्वी झाला नाही. या धक्क्यातून बाहेर पडायला मला कित्येक दिवस लागले,' अशा शब्दात त्याने बॉलीवुडचे वास्तव मांडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT