missumister 
मनोरंजन

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपची गोष्ट सांगणार 'मिस यु मिस्टर'!

सकाळ डिजिटल टीम

'अग्निहोत्र' मालिकेत हिट ठरलेली सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला. या प्रसंगी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आलाप देसाई, आनंदी जोशी यांच्या गाण्याने देखील सोहळ्यात बहार आली. ‘मिस यू मिस्टर’ 28 जूनला प्रदर्शित होत आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवविवाहित जोडप्याच्या भूमिकेत आहेत. वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत आणि सुरु होत ते 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' यादरम्यान बऱ्याच समस्या येतात असं दिसतंय, मग ते यातुन कसा मार्ग काढतात हे पाहणं औत्सुक्याचे आहे. 

चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली, “मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते.”

‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “मृण्मयीबरोबर काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.”

या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Interview: देवा म्हणजे देवाभाऊ की प्रत्यक्ष देव? उद्धव ठाकरेंचे खोचक उत्तर, नाव न घेता फडणवीस टार्गेट!

India vs England Women Cricket: लॉर्ड्‌सवर मोहीम फत्ते करण्याची संधी; भारतीय महिलांचा आज इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना

Cab Strike : कॅबचालकांच्या बंदमुळे प्रवासी वेठीस, आंदोलनाचा मोठा फटका; विमानतळावरील कॅबसेवा विस्कळित

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेची पाणीपातळी दीड फुटांनी घटली, तर आलमट्टी धरण भरले ८० टक्के

योगायोग येणार जुळून! उदयनराजे-शिवेंद्रराजेंचे होणार मनोमिलन? राजेंच्या 'त्या' विधानाने चर्चांना उधाण, शिवेंद्रराजे काय घेणार निर्णय?

SCROLL FOR NEXT