tamasha marathi movie news
tamasha marathi movie news esakal
मनोरंजन

Tamasha Live Movie Song: 'नजरेचा हो भाला, थेट काळजावरती घाला!'

युगंधर ताजणे

Marathi Movie: सोशल मीडियावर ज्या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपापसून चर्चा आहे तो ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलैपासून प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणे (Marathi Song) झळकले आहे. त्या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून या रॅप साँगमधून सचित पाटीलची ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे. त्याचा डॅशिंग लूक यात दिसत असून सचितने यात एका वृत्तनिवेदकाची भूमिका साकारली आहे. सचितची ही ओळख आपल्याला सिद्धार्थ जाधव (Sidhartha jadhav) करून देत आहे. या गाण्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे (Adarsha Shinde) यांनी हे गाणे गायले असून क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर संगीतकार अमितराज आहेत. 'वाघ आला'चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे.

गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, “चित्रपटात प्रेक्षकांना गाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत, त्यातील हे एक गाणं आहे. नवीन प्रयोग करायला नेहमीच मराठी चित्रपटसृष्टी सज्ज असते. गाण्यातून केलेला एक नवा प्रयोग. ही आमची कलाकृती प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.” तर संगीतकार अमितराज म्हणतात, “आम्ही नेहमीच काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक पात्राला साजेल, असे संगीत आवश्यक असल्याने आम्ही खूप विचार करून संगीत दिले आहे. प्रेक्षकांना आमची कलाकृती नक्कीच आवडेल.”

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “नेहमीच काही तरी हटके करणारे दिग्दर्शक संजय जाधव यांनी या चित्रपटात वेगळं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीतप्रेमींसाठी ‘तमाशा लाईव्ह’ म्हणजे एक पर्वणी आहे. यातील प्रत्येक गाण्यात काहीतरी प्रयोग करण्यात आला आहे. पहिल्या रोमॅंटिक गाण्याला रसिकांनी पसंती दर्शवल्यानंतर आता हे दुसरे गाणे आपल्या भेटीला आले आहे. आता इतर गाणीही लवकरच संगीतप्रेमींच्या भेटीला येतील. नक्कीच प्रेक्षकांना ही उत्साहाने भरलेली गाणी आवडतील, अशी आशा व्यक्त करतो.”

प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मित 'तमाशा लाईव्ह'ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT