marathi movie timepass 3 song sai tujha lekaru released  sakal
मनोरंजन

आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ.. टाईमपास ३ च्या गाण्यानं उडवलाय धुरळा..

रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३'मधील 'साई तुझं लेकरू' हे धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..

नीलेश अडसूळ

timepass 3 : लाखो तरुणांना वेड लावणारा मराठीतील एक दमदार चित्रपट म्हणजे रवी जाधव दिग्दर्शित (ravi jadhav) 'टाइमपास'. या चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद मिळाला की काही कालावधीतच या चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित झाला. या दोन्ही भागांच्या दमदार यशानंतर आता तिसरा भाग म्हणजेच 'टाइमपास ३' ;लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे आता दगडू आणि प्राजक्ताची नेमकी कोणती लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक भन्नाट गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (timepass 3 movie coming soon) (ravi jadhav upcoming movie) (hruta durgule in timepass 3)

'आई -बाबा आणि साईबाबा'ची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिले आहे. दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास ३' मध्येही पाहायला मिळणार आहे. 'साई तुझं लेकरू' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून साईच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत. या गाण्यात भाऊ कदम म्हणजेच दगडूचे वडील साईबाबांसमोर आभार मानत, दगडू तुमचाच लेकरू असल्याचे सांगत आहेत. दगडूवर तुमची कृपा कायम अशीच राहूदे, असेही ते सांगत आहेत. हे गाणे भाऊ कदम, प्रथमेश परब, आरती वडगबाळकर, मनमीत पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. 'तुझा हात असताना आता कुणाला घाबरू.. जिंकून आलंया साई तुझं लेकरू' अशा या गाण्याच्या ओळी आहेत.

(marathi movie timepass 3 song sai tujha lekaru released) (timepass 3 : sai tujha lekaru song out)

क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीतबद्धही केले आहे तर अमितराज आणि आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांनी गाण्याचं नृत्यदिग्दर्शन आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या 'टाइमपास ३' चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून यात दगडूच्या आयुष्यात आलेली 'पालवी' पाहायला मिळणार आहे. या पालवीची भूमिका हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. 'टाइमपास ३' २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT