ved, riteish deshmukh, genelia deshmukh, ved on ott, ved ott release date, ved box office SAKAL
मनोरंजन

Ved on OTT: या तारखेला वेड OTT होतोय रिलिज.. कधी, कुठे पाहता येणार जाणून घ्या एका क्लिकवर

अखेर वेडची OTT रिलीज डेट समोर आलीय

Devendra Jadhav

Ved on OTT News: रितेश देशमुख - जिनिलिया देशमुख यांचा वेड सिनेमा प्रचंड गाजला. वेड प्रदर्शित होऊन आता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला असला तरीही वेड सगळ्या महाराष्ट्रभरात गाजतोय.

दिवसेंदिवस वेडने कमाईचे नवीन आकडे मोडले. नुकतीच रितेश - जिनिलियाच्या वेड बद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे मराठी प्रेक्षकांना नक्कीच आनंद होईल. अनेकजण वेड OTT वर कधी येतोय याची वाट पाहत होते. अखेर प्रतीक्षा संपली आहे.

(marathi movie Ved is releasing on OTT on this date.. Know when, where to watch in one click)

वेड सिनेमात रितेश - जिनीलीया सोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. वेड ने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलं. वेड OTT वर रिलीज याची सगळेजण वाट पाहत होते.

अखेर वेडची OTT रिलीज डेट समोर आलीय. वेड आता २८ एप्रिलला OTT वर रिलीज होतोय. त्यामुळे २८ एप्रिल पासून वेड प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे.

वेड कुठे पाहायला मिळणार याचंही उत्तर आम्ही तुम्हाला देतो. वेड Hotstar वर रिलीज होतोय. रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून हि माहिती सर्वांसोबत शेयर केलीय. त्यामुळे प्रेक्षकांना खुप आनंद झालाय. आणखी एक खास गोष्ट म्हणजे वेड मराठी सोबतच हिंदी मध्ये सुद्धा हॉटस्टार वर पाहायला मिळणार आहे.

वेड सिनेमाच्या टीमने काहीच दिवसांपूर्वी एक पोस्ट शेयर केली होती. या पोस्टमध्ये वेड ने १०० दिवस पूर्ण केल्याचं सांगितलं आहे. All Time Blockbuster झालेल्या वेडने यशस्वी १०० दिवस पूर्ण केले आहेत.

वेडनेस कोणीही थांबवू शकत नाही.. तुमच्या प्रतिसादासाठी खूप आभार.. आमच्याकडे शब्दच नाहीत.. अशा शब्दात रितेशच्या मुंबई फिल्म कंपनीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत

१०० दिवस पूर्ण करून वेड ने कमाईत सुद्धा बाजी मारली आहे. वेडने आतापर्यंत ७४ कोटींचा टप्पा पूर्ण केलाय. जगभरात वेडने ७४ कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून भारतात वेडने ६०. ६७ कोटींची कमाई केली आहे.

अशाप्रकारे सैराटनंतर वेड सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरल्याची शक्यता आहे. वेड निमित्ताने मराठी सिनेमांची नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

Successful Delivery: 'साताऱ्यातील शासकीय रग्णालयात एका वेळी चार बाळांना जन्म'; आईसह तीन मुली, मुलगा सुखरूप, प्रसूतीची तिसरी वेळ

SCROLL FOR NEXT