Swapnil Mayekar Sakal
मनोरंजन

Swapnil Mayekar passed away: लेखक - दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचं निधन, सिनेमाच्या रिलीजपूर्वी झाली एक्झीट

मराठी पाऊल पडते पुढे ह्या उद्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे दुःखद निधन झाले आहे.

Aishwarya Musale

मराठी पाऊल पडते पुढे ह्या उद्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे दुःखद निधन झाले आहे.

आज पहाटे चेंबूर घाटलागाव येथे राहत्या घरी निधन झाले आहे. गेले काही महिने ते आजारी होते. हा त्यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता. वयाच्या 46 व्या वर्षी स्वप्नील मयेकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वप्नील मयेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब आहे. ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी स्वप्निल यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल होतं. स्वप्नील मयेकर यांच्या निधनानं आता मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

5 मे रोजी म्हणजेच उद्या स्वप्नील मयेकर यांचा मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच स्वप्नील मयेकर यांचे निधन झाल्याने या चित्रपटाच्या टीमवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाचं अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या कलाकारांनी काम केलं आहे. तसेच मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे स्वप्नील मयेकर यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT