Bigg Boss Marathi 4 Rakhi Sawant  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 4: "अंघोळ घालते राखी सावंत..." राखीला प्रसाद म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस मराठी आता दिवसेंदिवस रंगात येत आहे. घरामध्ये टास्क बराच गोंधळ उडाला आहे. दरम्यान टास्कवरून होणारी भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप - प्रत्यारोप हे होताना आपण बघत आलोच आहे. पण घरांमध्ये कधी कधी भांडण्याच्या पलिकडे विनोद मजाक , मस्तीपण तेवढीच होते. घरातील इतर सदस्य एकमेकांना घेऊन विनोद करत असतात. पण या वेळी चक्क प्रसादाने कॉमेडी केली आहे आणि घरातील इतर सदस्यांना हसवलं आहे.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

बिग बॉसच्या घरात आल्यावर फक्त पहिले काही दिवस प्रसाद जवादे चर्चेत होता मग ते भांडण असो किंवा कोणाबरोबर संभाषण असो. तो आपल्याच धुंदीत असायचा. प्रत्येक चावडी मध्ये महेश मांजरेकरदेखील प्रसादची विचारपूस करायचे. त्याचे हे वागणे घराच्या सदस्यांना समजत नव्हतं. पण जेव्हा पासून ड्रामा क्वीन राखी सावंत बिग बॉसच्या घरात आली आहे तेव्हापासून तिने प्रसादला नेहमी बोल बोल करत बोलतच केलं आहे .

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात ती प्रसाद जवादे बरोबर फ्लर्ट करताना दिसून आली होती. तर आता प्रसादने राखीसाठी रॅप बनवला आहे . हो व्हिडीओ समोर आला अन् जोरदार व्हायरलही झाला आहे. बिग बॉसच्या प्रमोमध्ये सगळे सदस्य एकत्र बसलेले दिसताय. तेव्हा प्रसाद राखीसाठी रॅप सुरु करतो, "अक्षय केळकर च्या राज्यात आली फाइव्ह स्टार कॅप्टनशीची टास्क....अंघोळ घालते राखी सावंत फाय स्टार्स" याशब्दानी तो रॅप सुरु करतो आणि घरातील इतर सदस्य या रॅपचा आनंद घेत आहे. कॅप्टन अक्षयला खुपचं हसु येत आहे. इतके दिवसांनंतर प्रसाद बॅक टु ट्रॅक आलेला पाहून सगळेच खुश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT