Rakhi Sawant flirt with prasad, bigg boss marathi 4 Instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात राखीनं शोधला नवा बॉयफ्रेंड?,याच्यासोबत सुरू केलं फ्लर्ट..

राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीनं जेव्हापासून आलीय तेव्हापासनं रोज खळबळजनक काहीतरी पहायला मिळत आहे.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात राखी आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करताना दिसत आहे. कधी ती सदस्यांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडतेय तर कधी कोणाला आपल्या प्रेमात पडायची जबरदस्ती देखील करताना दिसतेय. आता राखीच ती... काय करेल याचा नेम नाही. राखीच्या बॉयफ्रेंडचा तसा पाहिला तर एक इतिहास आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरातही तिनं आपले प्रेमाचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. चला,सविस्तर जाणून घेऊया नेमकी कोणासोबत राखी फ्लर्ट करतेय ते?(Rakhi Sawant flirt with prasad, bigg boss marathi 4)

Rakhi Sawant flirt with prasad, bigg boss marathi 4

तर बिग बॉस मराठीच्या घरात राखी प्रसाद सोबत फ्लर्ट करताना दिसणार आहे. त्याचं झालं असं की, राखी बोलता बोलता प्रसादकडे गेली आणि... प्रसादने राखीची माफी मागितली. प्रसाद म्हणाला,''माझी आई... राखी मी तुझ्या पाया पडतो... मला माफ कर''. त्यावर अमृता देशमुख म्हणाली, ''काय प्रसाद कसला बोर आहेस तू... '', राखी प्रसादला म्हणाली, ''काय झालं तुझ्या हृदयात? धकधक करने लगा क्या?'' असा एकंदरीत हा सगळा सीन बिग बॉसच्या घरात घडला. आता तुम्ही म्हणाल यात काय. अहो,पण ड्रामा क्वीन राखी अशीच तर वागते तिच्या प्रत्येक बॉयफ्रेंडसोबत...म्हणजे कुठे तरी पाणी मुरतंय... नाही का...

राखी आणि प्रसादच्या संवादाला मध्येच फोडणी देत अक्षय म्हणाला, ''त्याच्या हृदयात घोडा धावायला लागला बघ...'', प्रसाद म्हणाला,''आज दहन करणार आहे मी तो घोडा...'', अमृता देशमुख म्हणाली, ''कितना अच्छा मौका था यार...'', तेवढ्यात प्रसादच्या जवळ उगाचच घुटमळणाऱ्या राखीला प्रसाद म्हणाला, ''हिच्या अंगावर पड...'', तेव्हा राखी म्हणाली, ''मी मुलींच्या अंगावर नाही पडत...'' आता अशा पद्धतीनं राखीनं प्रसाद सोबत फ्लर्ट करायला सुरुवात केली आहे. त्यात बिचारा प्रसाद फसला नाही म्हणजे मिळवली. पण आता राखीचा हा नवा ड्रामा घरात गमतीशीर प्रसंग निर्माण करणार आणि प्रेक्षकांचेही मनोरंजन होणार यात शंका नाही.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

बघूया पुढे अजून काय झालं घरात. जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन चौथा सोम ते शुक्र रात्री १० वा आणि शनि - रवि रात्री १० वा आपल्या कलर्स मराठीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT