Kiran Mane
Kiran Mane 
मनोरंजन

बर्‍याच जणांना वाटतं मी ब्राह्मण द्वेष्टा, किरण मानेंची नवी पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

मुलगी झाली हो (Mulgi zali ho marathi Serial) या मालिकेतील प्रमुख कलाकार किरण माने (Kiran mane) सध्या लाईमलाईटमध्ये (social media news) आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सोशल मीडियावरुन अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यत किरण माने (Kiran Mane) यांनी सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या पोस्ट लिहून आपल्यावर त्या मालिकेतील इतर कलावंतांनी जे आरोप केले आहेत त्याचे खंडन केले आहे. याशिवाय ज्या कलाकारांनी माने यांच्या बाजुनं प्रतिक्रिया दिली आहे त्यांना माने यांनी धन्यवाद दिले आहे. सध्या आपण जे काही बोलतो आहोत त्याला राजकीय आणि धार्मिक रंग दिला जात असल्याचे बोलले जात आहे. यावरुन माने यांनी लिहिलेल्या पोस्टकडे (Social Media Post) चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

काही दिवसांपूर्वी माने (Kiran Mane political Post) यांनी एक राजकीय पोस्ट लिहिली होती. त्यावरुन गदारोळ होऊन त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. असा आरोप माने यांनी आपल्या सोशल मीडियावरुन केला होता. त्यामध्ये त्यांनी आपण राजकीय पोस्ट लिहिली म्हणून मालिकेतून काढल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात त्या मालिकेच्या निर्मात्यांनी या आरोपाचे खंडन केले. दुसरीकडे माने यांच्यावर मालिकेतील काही महिला कलाकारांनी गंभीर आरोप केले होते. त्यावेळी अभिनेत्री अनिता दाते आणि आणखी काही कलाकारांनी माने यांच्या बाजुनं प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले आहे.

आता माने यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "बघा, विचार करा. जरी तुम्हाला खरा किरण माने माहिती असला तरी ही रिस्क आहे.. प्राॅडक्शन हाऊस नाराज होणं परवडणारं नसतं आपल्या क्षेत्रात !" त्यावर या सगळ्या म्हणाल्या, "सर, आत्ता तुमच्यावर जे आरोप होताहेत ते पाहून आम्हाला खूप वेदना होताहेत. आम्हाला माहीतीयेत खरे किरण माने. आज आम्ही तुमच्या बाजूनं उभे नाही राहीलो तर आम्हाला रात्री झोप लागणार नाही. आम्हाला समाधानाची झोप महत्त्वाची आहे. कामाचं काय होईल ते होईल."... "तरीही अजून एकदा विचार करा." त्यावर त्या म्हणाल्या, "सर ! प्रामाणिकपणानं आणि सच्चाईनं वागून त्याचं फळ म्हणून आम्हाला कामावरून काढून टाकणार असतील, तर एखादं स्नॅक्स सेंटर काढू आणि आनंदानं चालवू...पण अन्याय आणि खोटं सहन नाही करू शकत."

...मला खूप भरुन येतंय भावांनो... आमच्या सिरीयलमधल्या ज्या-ज्या महिला माझ्या बाजूनं उभ्या राहिल्या, त्या अत्यंत उत्स्फूर्तपणे पुढे आल्या ! बर्‍याच जणांना वाटतं मी ब्राह्मण द्वेष्टा आहे ! नाही. माझ्या जवळचे लोक तुम्हाला सांगतील, मी जातवर्चस्ववाद्यांचा तिरस्कार करतो, कुठल्या जातीचा नाही !! माझ्या पोस्ट मध्ये चिन्मय-तन्मय दिसले की हे जातवर्चस्ववादी ओरडतात "बघा, हा ब्राह्मणद्वेष करतो." ...पण त्याच पोस्टमध्ये शेवटी मानवतेचा संदेश देणारे डाॅक्टर 'सहस्त्रबुद्धे' असतात, हे सगळे सोयीनं विसरतात... माझ्या पाठीशी उभ्या राहीलेल्या आणि विरोधात बोलणार्‍यांमध्ये जो फरक आहे, तोच फरक जात आणि जातवर्चस्ववाद्यांमध्ये आहे !!! अनिता दाते-केळकर, प्राजक्ता केळकर, श्वेता आंबीकर, शितल गीते आणि गौरी सोनार यांनी जे सत्व आणि स्वत्व दाखवलं याला तोड नाही !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT