doctor don 
मनोरंजन

डॉक्टर डॉन मालिकेने कोव्हिड विरुद्धच्या लढ्यात दिले मोठे योगदान; वाचा सविस्तर...

संतोष भिंगार्डे

मुंबई : कोरोना महामारीमध्ये अनेक कलाकार पुढे येत आहेत आणि आपापल्या परीने मदतीचा हात देत आहेत. मात्र आता झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेच्या टीमने काहीशी वेगळी मदत केली आहे. या मालिकेचा सेट मिरा भाईंदर परिसरात आहे आणि तो सेट संपूर्ण हॉस्पिटलचाच आहे. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या पाहता या मालिकेच्या टीमने हा सेट महापालिकेला कोव्हिड रुग्णांसाठी दिला आहे. 

महापालिकेला कोव्हिड सेंटरसाठी जागेची आवश्यकता होती. हॉस्पिटलचा सेट उभारलेला असल्याने 'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या टीमकडे जागेविषयी मागणी करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी मालिकेचा सेट महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

मुंबईतील रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असली तर उपनगरांमध्ये दिवसेंदिवस ही संख्या वाढत चाललेली आहे. रुग्णांना अॅडमिट करण्यासाठी बेडची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे या मालिकेचा सेट पालिकेने कोव्हिड रुग्णांसाठी घेतला आहे. या मालिकेचे चित्रीकरण आता मुंबईच्या बाहेर अन्य सेटवर होत आहे. देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी आदी कलाकार या मालिकेत काम करीत आहेत. 
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : दिवाळी पाडव्यादिवशी सोन्या-चांदीत घसरण; तुमच्या शहरातील नवीन भाव काय? जाणून घ्या

India vs Australia 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ विजयाचे फटाके फोडणार? रोहित-विराट पुन्हा असेल केंद्रस्थानी...

Maharashtra Rain Alert : राज्यासाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज....

Gold Prices Fluctuate : सोन्याचा दर सकाळी वाढला, रात्री घटला; दर काय राहणार सराफ व्यावसायिकांचे लक्ष

'शनिवारवाड्यात मस्तानी यांनीसुद्धा अनेकदा नमाज पठण केलं असेल'; वादानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपवर निशाणा

SCROLL FOR NEXT