marathi serials holi 
मनोरंजन

मराठी मालिकांमध्ये धुळवडीची धमाल

स्वाती वेमूल

होळी सण आणि धुळवडीची धमाल प्रेक्षकांना मराठी मालिकांमध्येही पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत होळीच्या सणाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जल्लोषात ढवळे मामी भांग प्यायल्याच्या नशेत अक्काच्या कारस्थानांचा पश्याकडे खुलासा करणार आहे. त्यामुळे होळीच्या जल्लोषासोबतच मालिकेत अक्काचा डाव उलटला जाणार आहे. अक्काच्या कारस्थानांपासून पश्या कुटुंबाचं रक्षण कसा करणार याची उत्सुकता असेल. तर ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एण्ट्री झाली नाही तर नवलंच. होळीच्या या पारंपरिक पुजेत संजनालादेखील सहभागी करावं अशी अनिरुद्धची इच्छा असते. अनिरुद्धच्या अशा वागण्याने अरुंधती दुखावली जाते. 

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या नात्यावर गैरसमजांचं मळभ आहे. होळीच्या निमित्ताने या दोघांमधले गैरसमज दूर होतील असं वाटत असतानाच  दोघांमधील दुरावा आणखी वाढला आहे. दीपा कार्तिकच्या नात्याचं भविष्य काय असेल हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेलच पण या संपूर्ण टीमने जल्लोषात होळी साजरी केली आहे.

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही शुभम-कीर्तीच्या नात्यात दुरावा आला आहे. ऐन सणाच्या दिवशीही शुभम कीर्तीकडून रंग लावून घेत नाही. शुभमचं हे वागणं कीर्तीला खटकतं. शुभमच्या अश्या वागण्याचं कारण कीर्तीला कळेल का? दोघांमधील हा दुरावा आणखी किती काळ रहाणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. होळीच्या निमित्ताने शुभम-कीर्तीवर एक रोमॅण्टिक गाणं देखिल चित्रित करण्यात आलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jana Gana Mana Controversy : 'जन गण मन' हे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी रचलेले गीत; भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update : खगोलशास्त्रज्ञ डॉ. नरेश दधिच यांचे निधन

Shocking News : मालकिणीचे कामगारावर जडले प्रेम, लग्नानंतर पती पैसे घेऊन फरार; महिलेने पोलिस ठाण्यात उचलले टोकाचे पाऊल

Bribery Action : 'साताऱ्यात लाचप्रकरणी लिपिक जाळ्यात'; शेळी पालनासाठी कर्ज मंजुरीसाठी मागितले पैसे, जिल्ह्यात खळबळ

Junnar Leopard News : जुन्नरमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांची वाढ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT