vaishali made 
मनोरंजन

गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

स्वाती वेमूल

प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. येत्या ३१ मार्च रोजी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वैशाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. पक्षप्रवेशानंतर वैशालीकडे कोणती जबाबदारी दिली जाईल, याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. राष्ट्रावादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतची माहिती दिली. वैशालीने आतापर्यंत मराठी चित्रपट, मालिका तसंच हिंदी चित्रपटातील गाणीही गायली आहेत. 

गायनस्पर्धांपासून करिअरची सुरुवात करणारी वैशाली वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटची आहे. २००८ मध्ये झी मराठी वाहिनीवरील 'सा रे ग म प' या गायनस्पर्धेचं विजेतेपद तिने पटकावलं होतं. प्रसिद्ध पार्श्वगायिका होण्यापर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. आयुष्यातील अनेक चढउतारांचा सामना करत वैशालीने गायनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. वैशालीने 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. 

वैशालीने मराठीसोबतच हिंदीतही आपल्या सुमधूर आवाजाची छाप सोडली. 'बाजीराव मस्तानी' या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातील 'पिंगा' हे गाणं वैशालीन गायलं आणि हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारदेखील मिळाले. 'कलंक' या चित्रपटातील 'घर मोरे परदेसिया' हे गाणंसुद्धा तिने श्रेया घोषालसोबत मिळून गायलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT