Nikhil Lanjekar and Himanshu Ambekar
Nikhil Lanjekar and Himanshu Ambekar 
मनोरंजन

आवाज कोणाचा? मराठी इंडस्ट्रीतील दोन तरुणांचा यशस्वी प्रवास

सकाळ डिजिटल टीम

चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम आहे. परंतु यातील दृश्य मूल्यावर जितका विचार अथवा खर्च केला जातो तितका दुर्दैवाने श्राव्य म्हणजे ध्वनीचा विचार केला जातोच असे नाही. परंतु गेल्या काही वर्षात हे चित्र बदलताना दिसत आहे. नुकतंच पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये Filmfare awards निखिल लांजेकर Nikhil Lanjekar आणि हिमांशू आंबेकर Himanshu Ambekar या तरुणांना ध्वनीलेखनासाठी (Best Sound Designer) फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. हे आतापर्यंत काहीसे दुर्लक्षित क्षेत्र किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्याशी बोलून कळते. (marathi sound designers nikhil lanjekar and himanshu ambekar inspirational journey)

निखिल आणि हिमांशूने आजपर्यंत फर्जंद, फत्तेशिकस्त या ऐतिहासिक सिनेमांप्रमाणेच मन फकिरा, बस्ता, आगामी पावनखिंड, मनाचे श्लोक तसेच ओटीटीसाठी रात बाकी है अशा सिनेमांसाठी ध्वनिलेखनाचे म्हणजेच साऊंड डिझाइनचे काम केले आहे. याव्यतिरिक्त किमान सहा-सात सिनेमांचे काम त्यांच्याकडे आहे.

चित्रपटाचा अपेक्षित परिणाम साधण्यासाठी ध्वनी हा महत्त्वाचा घटक ठरतो. ऐतिहासिक असो वा सामाजिक (Contemparary) चित्रपटातील काळ उभा करणे तसेच त्यातील नाट्यमयता वाढविण्यासाठी ध्वनीचा वापर महत्त्वाचा ठरतो. त्यातून जर चित्रपट ऐतिहासिक असेल तर त्यासाठी ध्वनी संयोजन करणे आव्हानात्मक असते. तो काळ, त्या काळातील वातावरणनिर्मिती (Ambiance design) करणे, वेगवेगळ्या शस्त्रांचे आवाज तयार करणे ते अगदी पात्रांचे कपडे, दागिने भारदस्तपणे ऐकू येणे, पात्रांचे संवाद वजनदारपणे ऐकू यावेत यासाठी ध्वनी संयोजकांचे कौशल्य पणाला लागते. ध्वनीलेखक म्हणजे केवळ तंत्रज्ञ नव्हे, तर कलाकारही असावे लागतात. ध्वनिलेखनाचे प्रयोग कथाकथनाला बहर आणतात.

हेही वाचा : श्रुती हासन आर्थिक संकटात; म्हणाली 'आई-बाबा माझी बिलं भरणार नाहीत'

फर्जंद हा निखिलचा स्वतंत्र ध्वनीलेखक (Sound designer) म्हणून पहिला चित्रपट. फर्जंदसारखा युद्धपट सुमारे ४० वर्षांनी मराठी तयार होत होता. त्याकरता आपल्या क्षेत्रात याचे मॉडेल निखिलसमोर नव्हते. म्हणून त्याने अशा चित्रपटांचे पारंगत तंत्रज्ञ असलेल्या दक्षिणेत या चित्रपटाचे साऊंड मिक्सिंग करायचे ठरवले. दक्षिणेतील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या स्टुडिओमध्ये काम केले, तिकडची कार्यपद्धती शिकून घेतली आणि या जबरदस्त युद्धपटाचा ध्वनी साकारला. चित्रपटासाठी निखिल आणि हिमांशूने विशेष अभ्यास केला. निखिल स्वत: मराठा शस्त्रकलेमध्ये पारंगत आहे. सर्व कलाकारांना शास्त्रांचे प्रशिक्षण निखिल स्वत: देतो. त्यामुळे कुठले शस्त्र त्याच्या आकार, वजनानुसार कसा आवाज करेल, त्याची नाट्यमयता कशी वाढवता येईल याचा निखिलचा आपसूकच अभ्यास झाला होता. ध्वनीमधून 'लार्जर दॅन लाइफ' परिणाम कसा साधायचा यात निखिल आणि हिमांशूचा हातखंडा आहे. 'फत्तेशिकस्त' सिनेमासाठी त्यांना मिळालेला पुरस्कार हे त्यांच्या कामावरचे शिक्कामोर्तबच म्हणता येईल. निखिलने बर्लिन इंटरनॅशनल साऊंड डिझाइन आणि बूम लायब्ररी साऊंड डिझाइन या स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश मिळवलं आहे.

ही सगळी कामे निखिल आणि हिमांशू पुण्यातल्या त्यांच्या नॉईज स्टोरीज या कंपनीमार्फत करतात. या कंपनीचे मुंबईतील बहुतांश मोठ्या साऊंड स्टुडिओजशी टायअप आहेत. करिअर म्हणून वेगळी वाट निखिल आणि हिमांशूने अवलंबली आणि त्यात आता यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. यासंदर्भात विचारल्यावर ते म्हणाले की, खूप कष्ट करण्याची तयारी, सतत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, क्रिएटिव्ह विचार करणे याची तयारी असेल तर या क्षेत्रात युवकांसाठी नवनव्या संधी उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT