ankush chaudhary
ankush chaudhary 
मनोरंजन

अंकुश चौधरीची मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक

सकाळ ऑनलाइन

'लेट्सफ्लिक्स मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये मराठी अभिनेता अंकुश चौधरी याने गुंतवणूक केली आहे. दगडी चाळ, दुनियादारी, ट्रिपल सीट, क्लासमेट अशा अनेक चित्रपटांत अंकुशने काम केले आहे. अंकुश गेली २५ वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्याने ४० हून अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि इंडिया नेटवर्कचे संस्थापक राहुल नार्वेकर यांनी नुकतीच 'लेट्सफ्लिक्स मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली. 

या भागीदारी संदर्भात अंकुशला विचारले असता, अंकुश म्हणाला, "मला 'लेट्सफ्लिक्स मराठी' ची संकल्पना आवडली आणि जेव्हा नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर हे संस्थापक असल्याचे समजले तेव्हा अशा टॅलेंटेड लोकांसोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी एक नवीन अनुभव असेल म्हणून मी लगेचच यासाठी सहमती दर्शवली. मराठी मनोरंजन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे आणि मराठी आशयासाठी असलेल्या या स्वतंत्र ओटीटी माध्यमाच्या निर्मितीमुळे मराठी कलाकारांना नामी संधी उपलब्ध होणार आहे. आम्ही तिघे मिळून जगभरातील मराठी भाषिक प्रेक्षकांना चांगला मराठी आशय (कंटेंट) देण्यासाठी प्रयत्नशील असू."

या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सह-संस्थापक राहुल नार्वेकर आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले की, "जेव्हा मी अंकुशला भेटलो तेव्हा माझ्या लक्षात आले की, मराठी प्रेक्षकांसाठी काय हवे आहे याचे बारकावे समजून घेण्यास आम्हाला त्याची मदत होईल. त्याच्यासोबत लेट्सफ्लिक्सवर काम करायला मला नक्कीच आवडेल".

गेल्या काही वर्षांमध्ये, दर्जेदार आशय निर्माण झाल्याने मराठी मनोरंजन क्षेत्र प्रगतीपथावर पोहोचले आहे. अशातच 'लेट्सफ्लिक्स मराठी'च्या येण्याने नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. यात ओरिजनल मराठी चित्रपट, वेब सीरिज, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंट्री, इत्यादी दाखविले जातील. लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगला त्याचप्रमाणे इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT