Hardeek Joshi and Akshaya Deodhar Sakal
मनोरंजन

Valentine Day 2023: व्हॅलेंटाईन डे म्हणजे हार्दिक जोशीनं सांगितली मनाला भिडणारी प्रेमाची व्याख्या

'व्हॅलेंटाइन्स डे' म्हटलं की प्रत्येकाला त्यांच्या लव्हस्टोरी फुलतानाचे दिवस आठवतात. पहिली भेट, मैत्री मग हळुवार फुलणारं प्रेम असं सगळं आठवतं. आपले लाडके कलाकारही याला अपवाद नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

Hardeek Joshi on Valentine Day 2023: जगभरात १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. मराठी मनोरंजन विश्वातही असे काही कलाकार आहेत, ज्यांनी प्रेमविवाह केला. त्यांची पहिली भेट कधी झाले, ते कसे प्रेमात पडले हे सगळं जाणून घेण्यसाठी प्रत्येकजण उत्सुक असतात.

अभिनेता हार्दिक जोशी पत्नी अक्षयाबाबत बोलताना म्हणाला, मला असे वाटते प्रत्येक क्षणात आनंद शोधला पाहिजे.

व्हेलेंटाईन म्हणजे फक्त आपली प्रेयसी नसून माझे काम, माझी आई, बाबा माझे कुटुंब आणि मित्र मंडळीही आहेत. म्हणून मी कामाची सुट्टी घेतली नाही. वेळ काढून मी माझ्या कोल्हापूरच्या मित्रमंडळींनाही वेळ नक्की देणार आहे.

माझ्यासाठी माझ्या लोकांचा सहवास हाच माझा व्हेलेंटाईन डे आहे. व्हेलेंटाईन डेबद्दल माझे इतके मोठे प्लॅन नाही; पण हो सकाळी मी अक्षयाला शूटच्या अगोदर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात घेऊन जाईन. अक्षयाला साडी खूप आवडते, तर साडीच्या दुकानात घेऊन जाईन.

तिला जी साडी आवडेल ती विकत घेऊन देईन. तिला साधेपणा खूप आवडतो. तसेच शूट संपल्यावर तिला कोल्हापुरात तिच्या आवडत्या ठिकाणी जेवायला घेऊन जाईन.

तिला बायको म्हणून थोडे अधिक स्पेशल ट्रीट करेन. फक्त व्हेलेंटाईन डे आहे म्हणूनच असे वागले पाहिजे, असे मला नाही वाटत. जेव्हा-जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा आपण आपल्या प्रियजनांसाठी काहीतरी नक्कीच करू शकतो.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून हार्दिक आणि अक्षया घराघरात पोहोचले. राणादा-पाठकबाईंची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरली होती. ते खऱ्या आयुष्यातही विवाहबद्ध झाल्याने चाहतेही खूश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News : सप्तशृंगी देवी यात्रेला सुरुवात,देवीच्या आभूषणांची पूजा

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT