'गड आला, पण सिंह गेला' असे वर्णन ज्या मर्द मावळ्याचे केले जाते त्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचा इतिहास 'तानाजी : द अनसंग वॉरियर'मधून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'तानाजी' चित्रपटाचा हिंदी ट्रेलर यापूर्वीच प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा सिनेमा मराठी भाषेतही प्रदर्शित होणार असून त्याच्या मराठी ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे.
काजोलने स्वत: ट्विट करत हा मराठी ट्रेलर सर्वांसोबत शेअर केला केला आहे. ''छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित एक झंझावात ट्रेलर आलाय तुमच्या भेटीला,'' असे ट्विट तिने केले आहे.
'तानाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये अजय देवगण नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तानाजीचा शौर्य, पराक्रम आणि कोंढाणा जिंकण्याची जिद्द ट्रेलरमध्ये दिसून येते. उदयभानूशी निधड्या छातीने लढणाऱ्या, शिवाजी महाराजांची आज्ञा पाळणाऱ्या आणि पत्नी-मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तानाजींचे बलाढ्य रूप मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सैफ अली खानने साकारलेला उदयभानू दमदार आहे.
काजोल तानाजी मालुसरेंच्या पत्नीची म्हणजेच सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारत आहे. आजपर्यंत फक्त तानाजींच्याच पराक्रमाबाबत इतिहासात नोंद होती, मात्र सावित्रीबाई त्यांच्या पाठिशी कशा भक्कमपणे उभ्या राहिल्या हे 'तानाजी'मध्ये बघायला मिळेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.