Aai Kuthe Kay Karte: Madhurani Prabhulkar enjoy a christmas holiday but netizens trolled her, actress angry reply Instagram
मनोरंजन

Aai Kuthe Kay karte: 'मराठी परंपरेचा इतका पुळका आहे तर..', मुलीसोबत सुट्टीवर गेलेली मधुराणी कोणावर भडकली?

मधुराणी प्रभूलकर सध्या मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करतेय. तिनं काही फोटो पोस्ट केले तेव्हा तिला ट्रोल केलं गेलं..पण अभिनेत्रीनं कडक पलटवार केलाय.

प्रणाली मोरे

Aai Kuthe Kaay Karte: सध्या 'आई कुठे काय करते' ही मालिका अनेक रंजक वळणांवरनं प्रवास करत आहे. मालिकेमुळे मधुराणीची चर्चा नेहमी सुरुच असते पण आता सोशल मीडियावरील तिच्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. सध्या मधुराणी आपल्या मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करताना दिसतेय. तिनं तसे आपले फोटोही छान-छान पोस्ट केले होते. पण तिच्या या आनंदात कोणीतरी आडकाठी आणली अन् यामुळे अभिनेत्रीचा पारा चढला. (Aai Kuthe Kay Karte: Madhurani Prabhulkar enjoy a christmas holiday but netizens trolled her, actress angry reply)

मधुराणी सध्या आपल्या मुलीसोबत शूटिंगमधनं वेळ काढत सुट्टीचा आनंद घेतेय. तिनं सोशल मीडियावर छान छान फोटो पोस्ट केले होते. पण याच तिच्या फोटोवर आक्षेप घेत एका नेटकऱ्यानं कमेंट केली अन् तिथून सुरु झालं तू-तू..मै-मै. अर्थात या वादात मधुराणीच्या चाहत्यांनीही उडी घेतल्यानं वाद बराच रंगला. चला जाणून घेऊया नेमकं घडलं काय.

मधुराणीनं आपल्या मुलीसोबतचे काही फोटो पोस्ट केलेयत. ज्यात तिनं जीन्सची पॅंट आणि छान गुलाबी रंगाचा टी-शर्ट असा पेहराव केला आहे. तिच्या कपाळावर तिनं बिंदी लावलेली नाही. तिचे केेस तिनं मोकळे सोडले आहेत. अर्थात या लूक मध्ये ती सुंदरच दिसत आहे.

पण एका नेटकऱ्याला मात्र तिचा हा पेहराव खटकला. अन् त्यानं तिच्या त्या फोटोवर कमेंट करत लिहिलं की,''सभ्य भूमिका केल्यानंतर मॉडर्न लुक मधील फोटो काढून शेअर करण्याचे काय कारण आहे? विवाहित स्त्रिया काहीही असो कुंकू लावतात''.

''आणि कुंकू लावल्यामुळे त्यांना कोणी मॉडर्न रोल देणार नाही असे नाही. मालिकेत सभ्य भूमिका केल्यानंतर त्यांच्या आपल्या मुलींना असा आदर्श घालून देणे हे कितपत योग्य आहे? दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा वैयक्तिक आयुष्यात प्रकर्षाने पाळतात''.

आता नेटकऱ्यांची ही कमेंट वाचून मधुराणीनं मात्र चांगलाच पलटवार केला आहे. तिनं लिहिलंय की,''मी वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मला सांगणारे तुम्ही कोण? मराठी परंपरेचा इतका पुळका आहे तुम्हाला मग तुम्ही पाश्चात्य लोकांचा ब्लेझर घालून फोटो का काढलाय? मराठी पेहराव करायला हवा होतात न...''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT