Margaret Nolan goldfinger actress dies at 76 
मनोरंजन

जेम्स बॉण्ड गर्ल' मार्गारेट नोलान यांचं निधन

दीपा म्हात्रे

मुंबई : हॉलिवू़डमधील अतिशय लोकप्रिय आणि गाजलेल्या 'जेम्स बॉण्ड' या चित्रपटाच्या सीरिजमधील 'गोल्डफिंगर' या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून झळकलेल्या अभिनेत्री मार्गारेट नोलान यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'जेम्स बॉण्ड गर्ल' म्हणूनही त्या ओळखल्या जात होत्या.

नोलान यांचा मुलगा ऑस्कर यानं यासंदर्भातील बातमी माध्यमांना दिली. ५ ऑक्टोबरलाच नोलान यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. दिग्दर्शक एडगर राईट यांनी ट्विटरवर नोलान यांना श्रद्धांजली वाहिली.

'अभिनेत्री मार्गरेट नोलान यांच्या निधनाचं वृत्त सांगणं हे अतिशय दु:खद आहे. त्यांना बीटल्स आणि आयकॉनिक बॉण्डसह पाहिलं गेलं होतं', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. 'गोल्डफिंगर' चित्रपटाचं पोस्टर, अनेक विक्रम, पुस्तकं आणि चित्रांवर मार्गरेट यांचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता.

अनेक दशकांपूर्वी त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०११ मध्ये 'द पॉवर ऑफ टू मॅन' या चित्रपटातून झळकल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

भाजप नेत्यांना फिरू देणार नाही! जरांगेंचा दिल्लीतून इशारा; जंतरमंतरवर आंदोलकांची घेतली भेट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, तर धर्मेंद्र प्रधान ओम बिर्लांच्या भेटीला

Delhi Protest '...त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके', लाठीमारात जखमी नागपूरच्या तरुणाच्या कुटुंबीयांचा संताप

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

SCROLL FOR NEXT