Sangram Samel and Shraddha Samel Sakal
मनोरंजन

लग्नाची गोष्ट : कलासक्त ‘ब्रेव्हहार्ट’ जोडी!

कधी नायक, कधी खलनायक, तर कधी सहायक व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलेला अभिनेता म्हणजे संग्राम समेळ.

सकाळ वृत्तसेवा

कधी नायक, कधी खलनायक, तर कधी सहायक व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलेला अभिनेता म्हणजे संग्राम समेळ. सहा महिन्यांपूर्वीच तो विवाहबद्ध झाला. श्रद्धा समेळ हे त्याच्या पत्नीचं नाव. श्रद्धा उत्कृष्ट नृत्यांगना आहे. त्यासोबतच ती झुंबा या नृत्यप्रकाराचे धडेही देते. या दोघांचं अरेंज मॅरेज. श्रद्धाची मानलेली बहीण ही संग्रामची मैत्रीण. तिनंच संग्रामसाठी श्रद्धाचं स्थळ आणलं. एकमेकांना भेटल्यावर त्यांना एकमेकांचे स्वभाव व विचार आवडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

संग्राम म्हणाला, ‘माझं माझ्या कुटुंबीयांवर खूप प्रेम आहे. मला लग्नानंतर त्यांच्यापासून वेगळं राहायचं नव्हतं. त्यामुळे बायको म्हणून मला अशी मुलगी हवी होती, जी माझ्या घरच्यांना समजून घेईल, माझ्या घरच्यांवर प्रेम करेल; श्रद्धा अशीच मुलगी आहे. तिची जॉईंट फॅमिली असल्यामुळं आमच्यात तो प्रश्न कधी निर्माण झालाच नाही. ती खूप समजूतदार आहे. छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायच्या, प्रत्येक गोष्टीत आनंद मानायचा आणि कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता स्वछंदीपणे आयुष्य जगायचं, हा तिचा स्वभाव मला खूप आवडतो. ती खूप प्रेमळ आणि सगळ्यांमध्ये पटकन मिसळणारी आहे. तिच्या मनमोकळ्या स्वभावानं ती प्रत्येकाला आपलंसं करून घेते. ती उत्कृष्ट नृत्यांगना आहे.

अतिशय नम्र, शांत स्वभाव आहे तिचा. तिला कसलाही गर्व नाही. ती स्वच्छताप्रिय आहे. माझ्या प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात तिची साथ मला लाभली आहे. तिला माझं काम आवडलं, तर ती भरभरून कौतुक करते, पण काही कमी वाटलं तेही सांगते. तिचं आणि माझं क्षेत्र वेगळं असलं, तरी मी तिला सेटवर काय घडलं, आज कशी मजा आली किंवा आज कोणते सीन्स केले हे सगळं मी तिच्याशी शेअर करतो. त्यासोबतच एखादी नवी भूमिका सकारायची असल्यास त्याबद्दलही तिचं मत जाणून घेतो. तीदेखील तितक्याच प्रामाणिकपणे माझं बोलणं ऐकून घेते आणि मला सल्ले देते. ती माझ्यापेक्षा लहान आहे पण ती माझ्याहून मॅच्युअर आहे. तिच्यामुळं मीही थोडा मॅच्युअर झालो आहे. तिच्या येण्यानं मला कम्फर्ट झोन मिळाला. कारण ती माझ्या घरच्यांसाठी खूप कम्फर्ट निर्माण करते. घरातील वातावरण हसतं खेळतं आणि आनंदी ठेवण्यात श्रद्धाचा मोठा वाटा आहे.’’

श्रद्धानं सांगितलं, ‘आम्ही एकमेकांशी बोलायला सुरुवात केल्यावर संग्राम मला म्हणाला, ‘पुढं आपलं नातं नवरा बायकोचं होईल न होईल, पण आपण आयुष्यभर चांगले मित्र नक्कीच राहू.’ तिथंच तो मला तो आवडला. संग्राम हा मला माहीत असलेला सगळ्यात जेन्यूअन मुलगा आहे. तो खूप प्रेमळ आहे. त्याला माणसं खूप हवीहवीशी असतात. त्याच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येकावर तो अत्यंत निरपेक्ष प्रेम करतो आणि सगळ्यांची खूप काळजी घेतो. तो सगळ्यांचा विचार करतो, तसंच नाती सुंदरपणे जपतो. कुणाला काय हवं आणि काय नको हे संग्रामला चांगलं कळतं. त्याच्यासोबत राहून मलाही ते हळूहळू जमू लागलं आहे. एखादी व्यक्ती ओळखीची असो वा नसो, संग्राम प्रत्येकाशी तितक्याच आपुलकीने बोलतो. त्याला स्वतःच्या कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव आहे.

घरातलं एखादं काम असो वा कॅमेऱ्यासमोर अभिनय करायचा असो; प्रत्येक काम तो मन लावून करतो. त्यानं ‘एकच प्याला’ या नाटकात आणि ‘ब्रेव्हहार्ट’ या चित्रपटात केलेलं काम मला फार आवडलं आहे. तो कधीही स्वस्थ बसत नाही, तर त्याला सतत नवनवीन काहीतरी शिकायचं असतं आणि त्याच्यातली ही अभ्यासू वृत्ती मला खूप आवडते. मला छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं. पण या छोट्याछोट्या गोष्टींना कसं हाताळलं पाहिजे, हे त्यानं मला शिकवलंय. माझे झुंबाचे क्लासेस किंवा दुसरं एखादं काम; संग्राम या सगळ्यात खूप सहभाग घेतो. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायला तो मला एकटं सोडत नाही. त्याच्यामुळं मला आयुष्याकडं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आहे. तो खरोखरच बेस्ट पार्टनर आहे.’’

- संग्राम समेळ, श्रद्धा समेळ

(शब्दांकन - राजसी वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT