Mary Millben: "PM Modi will win again in 2024", American singer's big prediction SAKAL
मनोरंजन

Mary Millben: "२०२४ मध्ये पुन्हा PM मोदीच जिंकणार", अमेरिकन गायिकेची मोठी भविष्यवाणी

लोकसभा निवडणुकीबद्दल अमेरिकन गायिकेने पंतप्रधान मोदींबद्दल भविष्यवाणी केलीय

Devendra Jadhav

Mary Millben - Pm Modi News: आफ्रिकन-अमेरिकन हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेनने अनेकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत असते. अशातच मेरीने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

मिलबेनने मोदी हे भारतासाठी आणि अमेरिका - भारत या दोन्ही देशांमधील संबंधांसाठी सर्वोत्तम नेते असल्याचं तिने सांगितलं आहे. काय म्हणाली मेरी? वाचा सविस्तर.

लोकप्रिय आफ्रिकन - अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मिलबेनने गुरुवारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "अमेरिकेतील अनेक लोकांना मोदी पुन्हा निवडून येतील यावर विश्वास आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी मे महिन्यात निवडणूक जिंकण्याच्या मार्गावर आहेत. माझा विश्वास आहे की, अनेकांना पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधानपदावर पाहायचं आहे. कारण ते भारतासाठी सर्वोत्तम नेते आहेत."

मी पंतप्रधान मोदींची समर्थक: मिलबेन

मिलबेन या मुलाखतीत पुढे म्हणाली, "आता संपूर्ण भारताला माहित आहे की मी पंतप्रधानांची मोठी समर्थक आहे. आणि ते भारतासाठी सर्वोत्तम नेते आहेत. आता प्रत्येक नागरिकाने आपल्या देशासाठी पुढे आलं पाहिजे. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या मतांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होईल अशी मला आशा आहे."

मोदींनी भारताला आर्थिक महासत्ता बनवले

मिलबेन याच मुलाखतीत पुढे म्हणाली, "पंतप्रधान मोदींनी केवळ भारतातच नव्हे तर जगभर भारताला खरा आर्थिकदृष्ट्या मजबूत देश म्हणून प्रस्थापित करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या धोरणांनी महिलांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी नक्कीच प्रोत्साहन दिले. द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती म्हणून उदय आणि मंत्रिमंडळात अधिकाधिक महिला नेत्यांचा समावेश करण्याचे त्यांचे प्रयत्न आपण पाहिले."

भारतामध्ये मिलबेनचे मोठे चाहते आहेत, विशेषत: तिने गायलेले भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' आणि "ओम जय जगदीश हरे" सादर केल्यानंतर तिचे भारतात चाहते वाढले.

2024 मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. मिलबेन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT