Masaba Gupta Wedding Celebration Google
मनोरंजन

Masaba Gupta:'स्विमिंग कॉश्युमवर ओढणी बांधलीय का..', वेडिंग सेलिब्रेशनमधील मसाबाचा ड्रेस लोकांना खटकला..

नीना गुप्ता यांची मुलगी फॅशन डिझायनर मसाबा गुप्तानं आपला बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा सोबत नुकतंच दुसरं लग्न केलं आहे.

प्रणाली मोरे

Masaba Gupta:' बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी मसाबा गुप्तानं आपला बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा सोबत अखेर शुभमंगल उरकलं आहे. तिनं आपल्या जवळचे कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वेडिंग सेलिब्रेशन केलं.

लग्नानंतर संपूर्ण कुटुंबानं वेडिंग सेलिब्रेशन पार्टी एन्जॉय केली. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही नेटकरी मात्र मसाबाच्या कपड्यांवर खूप वाईट कमेंट करताना दिसत आहेत. काही लोकांनी म्हटलं आहे की तिनं स्विमिंग कॉश्युमवर ओढणी बांधली आहे. (masaba gupta troll wedding celebration dress netizens comment)

मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रानं संपूर्ण कुटुंबासोबत सेलिब्रेशन पार्टी एन्जॉय केली. नीना गुप्ता देखील आपल्या मुलीच्या लग्नात सुंदर दिसत होत्या. मसाबाचे वडील विवियन रिचर्ड देखील लग्नसोहळ्यास हजर राहिले होते. पार्टीनंतर नीना आणि मसाबानं मिळून पापाराझीला मिठाई वाटली. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर मसाबाचा ड्रेस पाहून मात्र लोक नको-नको त्या कमेंट करू लागले आहेत.

मसाबाच्या कपड्यांवर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'डिझाइनर असूनही स्वतःसाठी चांगले कपडे डिझाइन करू शकली नाही. काय कामाची अशी डिझाइनर'. दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'ओढणी का बांधलीय अशी'. तर आणखी एकानं लिहिलं आहे, 'आथियाच्या लग्नात सुनिल शेट्टीनं केलेला पेहराव हिनं कॉपी केलाय वाटतं...'

माहितीसाठी सांगतो की, मसाबा गुप्ताचं हे दुसरं लग्न आहे. तिनं मधु मंटेना सोबत २०१५ साली पहिलं लग्न केलं होतं. मधु मंटेना हा बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आहे. दोघे २०१९ मध्ये विभक्त झाले होते. तसंच,सत्यदीपचं देखील हे दुसरं लग्न आहे. त्यानं २००९ मध्ये अभिनेत्री अदिती राव हैदरी सोबत लग्न केलं होतं. पण २०१३ मध्ये त्यांच्या नात्याचाही द एन्ड झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT