Matthew Perry's last Instagram post goes viral Esakal
मनोरंजन

Matthew Perry: मॅथ्यू पेरीच्या संशयास्पद मृत्यूचं गूढ वाढलं, शेवटच्या इन्स्टा पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

Vaishali Patil

आज सकाळी मनोरंजन विश्वातून एक दुख:द बातमी समोर आली. फ्रेंड्स या आयकॉनिक शोमध्ये चँडलर बिंगची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता मॅथ्यू पेरी याचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहीतीनुसार, शनिवारी मॅथ्यू त्याच्या लॉस एंजेलिस येथील घरी हॉट टबमध्ये मृतावस्थेत आढळला.

अमेरिकन कॅनेडियन विनोदी अभिनेता आणि निर्माता मॅथ्यू पेरी हा लोकप्रिय सिटकॉम शो फ्रेंड्सच्या सहा मुख्य लीड्सपैकी एक होता. यात मॅथ्यूने चँडलर बिंगच्या भूमिकेनंतर प्रसिद्धीस आला.

पेरीच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्यासाठी नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत श्रद्धांजली वाहत आहे. त्याच दरम्यान मॅथ्यूने त्याच्या सोशल मिडियावर केलेली शेवटची पोस्ट आता चर्चेत आली आहे.

मॅथ्यूच्या मृत्यूनंतर त्याची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याच्या मृत्यूचा आणि त्या पोस्टचा संबध असल्याचे चाहते बोलत आहेत.

पाच दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्रामवर मॅथ्यूने इन्फिनिटी पूलमध्ये गरम पाण्यात आराम करतानाचा फोटो शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, "अरे, इतकं गरम पाणी आजूबाजूला फिरत राहिल्याने तुम्हाला बरं वाटतं? मी मॅटमॅन आहे",

त्यानंतर पाच दिवसात मॅथ्यूचा मृतदेह लॉस एंजेलिसच्या घरी हॉट टबमध्ये आढळला. आता त्याचे चाहते ती पोस्ट शेयर करत असा दावा करत आहे की, पोस्टमध्ये मॅथ्यू त्याच ठिकाणी आहे जिथे तो मृत सापडला आहे, परंतु अद्याप याबाबत माहीती मिळालेली नाही.

ट्विटरवरील नेटिझन्सने पोस्ट शेयर करत लिहिले आहे की, "ही त्याची 5 दिवसांपूर्वीची पोस्ट होती आणि तो नेमका इथेच बुडाला आहे. त्याचा हॉट टब. !!!",

तर दुसऱ्याने लिहिले, "मॅथ्यू पेरीची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट ही आहे. त्याच्या हॉट टबमधला फोटो. किती वाईट आहे." मॅथ्यू पेरी यांच्या निधनावर नेटिझन्सने सोशल मिडियावर पोस्ट शेयर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT