Matthew Perry’s family breaks silence: Esakal
मनोरंजन

Matthew Perry: मॅथ्यू पेरीच्या मृत्यूनंतर कुटुंबानं सोडलं मौन! प्रतिक्रिया चर्चेत

Vaishali Patil

Matthew Perry’s family breaks silence: 'फ्रेंड्स' फेम अभिनेता मॅथ्यू पेरी यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. हॉलिवूड, बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. मॅथ्यूच्या आकस्मिक निधनाने सर्वच दु:खी झाले असून सर्वांनी आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मॅथ्यू पेरीचा मृतदेह त्याच्या घराच्या हॉट टबमध्ये सापडला होता. अवघ्या ५४ व्या वर्षी मॅथ्यूने अखेरचा श्वास घेतला. अनेकांना या घटनेवर विश्वास बसत नाही आहे. त्यातच आता मॅथ्यू पेरीच्या कुटूंबाने त्याच्या मृत्यूबद्दल मौन सोडले आहे. मॅथ्यूच्या कुटुंबीयांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

मॅथ्यू पेरीची घटना अतिशय दुःखद असून त्यामुळे त्यांचे हृदय तुटल्याचे त्यांनी सांगितले. पेरीच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करुन सांगितले की पेरीचे चाहते आणि हितचिंतक त्याच्यासाठी खुप महत्वाचे होते.

"आम्ही आमच्या लाडक्या मुलाच्या आणि भावाच्या दुःखद निधनामुळे धक्क्यात आहोत. आम्ही दु:खी आहोत. मॅथ्यूने एक अभिनेता आणि मित्र म्हणून जगाला खूप आनंद दिला.

तुम्ही सर्वजण त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. आम्ही तुमच्या प्रेमाची प्रशंसा करतो.असे त्यांनी जारी केलेल्या निवेदनात कुटुंबाने म्हटले आहे.

पेरीच्या मृत्यूबद्दल सांगायचं झालं तर शनिवारी, 28 ऑक्टोबर रोजी लॉस एंजेलिसमधील त्याच्या घराच्या जकूझीमध्ये पेरी मृतावस्थेत आढळून आला होता. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

फ्रेंड्सची निर्मिती करणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स पेरीच्या मृत्यूनंतर एका निवेदनात म्हटले आहे, “आमचा प्रिय मित्र मॅथ्यू पेरी यांच्या निधनाच्या बातमीने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत.

मॅथ्यू हा एक अविश्वसनीय प्रतिभावान अभिनेता होता. वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन ग्रुपचा तो एक अविस्मरणीय भाग होता.

त्याने आपल्या विनोदी प्रतिभेचा प्रभाव जगभरात पसरवला. तो त्याच्या मित्रांच्या हृदयात जिवंत राहील."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

Flipkart Freedom Sale 2026: 8 ऑगस्टपासून सेल; iPhone पासून लॅपटॉपपर्यंत मोठी बचत! ऑफर्स पाहून व्हाल खुश, शॉपिंगपूर्वी नक्की वाचा!

Marathi News Live Updates : अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर भडकले

Mumbai Local Train: लोकलच्या सीटवर महिला झोपली, पुरुष प्रवाशाला राग अनावर; शिवीगाळ करत पट्टा काढला अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT