Elvish Yadav Latest news esakal
मनोरंजन

Who is Sagar Thakur : एल्विशचा लाथाबुक्क्यांनी मार खाणारा 'मॅक्सटर्न' उर्फ 'सागर ठाकूर' आहे तरी कोण?

एल्विशनं काही दिवसांपूर्वी सागर उर्फ मॅक्सटर्नला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

युगंधर ताजणे

Maxtern Alias Sagar Thakur Elvish Yadav : सोशल मीडियावर सध्या एल्विश यादव हा तुफान चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये तो एकाला बेदम मारहाण करत (Maxtern Alias Sagar Thakur Elvish Yadav) असल्याचे दिसून आले होते. यावरुन त्यानं आता तुम्ही त्या व्यक्तिचे म्हणणे ऐकले आता माझेही ऐका असे म्हणत नेटकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. या सगळ्यात त्यानं ज्यांना मारहाण केली तो मॅक्सटर्न अर्थात सागर ठाकूर आहे तरी कोण, याची चर्चा सुरु झाली आहे.

सागरला मारहाण केल्यानंतर त्यानं देखील एक व्हिडिओ पोस्ट करुन (Latest Entertainment news) आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी एका क्रिकेट सामन्यात एल्विश अन् मुनव्वर फारुखी हे गळाभेट घेतानाचे फोटो सोशल मीडियावरुन समोर आले होते. यावेळी एल्विशला नेटकऱ्यांनी टोकले. एरवी मुनव्वरला शिव्यांची लाखोली वाहणारा एल्विश आता मुनव्वरची गळाभेट कशी काय घेतो असा प्रश्न नेटकऱ्यांना आणि त्याच्या चाहत्यांना पडला होता.

या सगळ्यात मॅक्सटर्न अर्थात सागर ठाकूरचा एक व्हिडिओ समोर आला होता. यावेळी त्यानं एल्विशची विषयी काही प्रतिक्रिया दिल्याचे बोलले गेले. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचा राग मनात धरुन एल्विशनं सागरला बेदम मारहाण केल्याचे दिसून आले आहे. यात नेटकऱ्यांनी एल्विशनं ज्याला मारहाण केली तो सागर ठाकूर आहे तरी कोण याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

बिग बॉस ओटीटी २ चा विनर म्हणून एल्विश यापूर्वी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी म्हणूनही त्याचे नाव घ्यावे लागेल. एल्विश आणि मुनव्वर यांच्यातील भांडणं ही अनेकांना माहिती आहे. अशावेळी त्यांच्यातील तो मैत्रीपूर्ण व्हिडिओ चाहत्यांसाठी प्रतिक्रियेचा विषय आहे. आता एल्विशच्या विरोधात गुरुग्राम सेक्टर ५३ मधील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ मार्च रोजी त्याला पोलिसांनी तपासासाठी बोलावले आहे.

सोशल मीडियावर एल्विश व्हर्सेस मॅक्सटर्न आणि अरेस्ट एल्विश यादव असे दोन ट्रेंड सुरु झाले आहेत. एल्विशनं ज्याला मारहाण केली तो मॅक्सटर्न उर्फ सागर हा एक युट्युबर आहे. तो गेमिंग व्हिडिओ सेक्शनशी जोडला गेला आहे. त्याला युट्युबवर १.६ मिलियन युझर्स फॉलो करतात. तसेच इंस्टावर ३० हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो आयआयटी आणि वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओसंबंधी पोस्ट करत असतो. सागर म्हणतो की तो एल्विशला २०२१ पासून ओळखतो.

एल्विश जेव्हा बिग बॉस ओटीटी मध्ये होता तेव्हा पासून आमच्यात काही भांडणं आहेत. पण ती सोशल मीडियापुरतीच संबंधीत होती. एल्विशनं एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यामध्ये तो म्हणतो की, मी जेव्हा बिग बॉस ओटीटीमध्ये होतो तेव्हा सागरनं काही वाईट कमेंट केल्या होत्या.त्यामुळे नेटकरी नाराज झाले होते. एल्विश अन् सागरचा वाद जेव्हा सुरु झाला तेव्हा त्याचा फोटो मुनव्वर फारुखी सोबत व्हायरल झाला.

तो फोटो पोस्ट करत मॅक्सटर्ननं एल्विशची यथेच्छ टिंगल केली होती. त्यावेळी एल्विशनं देखील त्याला जशास तसे उत्तर दिले होते. भावा तू दिल्लीत राहतोस ना, म्हटलं तुला एकदा आठवण करुन द्यावी. अशा शब्दांत एल्विशनं त्याला ताकीद दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

वडील समजून दुसऱ्यावरच अंत्यसंस्कार; हत्या करून जाळून फेकलेल्या मृतदेहाचे रहस्य कायम

Jintur accident news: जिंतूरजवळ भीषण अपघातात वसमतचे मामा-भाचा ठार; शहरात शोककळा, बाजार बंद

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

SCROLL FOR NEXT