mayuri deshmukh 
मनोरंजन

अभिनेत्री मयुरी देशमुखने पती आशुतोषच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच शेअर केला व्हिडिओ

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरे याने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं. नैराश्याचा सामना करत असलेल्या आशुतोषने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे कुटुंबियांसह प्रेक्षकवर्गही हादरुन गेला. स्वाभाविकच पत्नी अभिनेत्री मयुरी देशमुख हिला जबर धक्का बसला. त्यानंतर पहिल्यांदाच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती तिची जवळची मैत्रीण श्वेता हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आणि त्याचबरोबर ती त्यांच्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे सांगतेय.

मयुरीने सांगते, 'माझ्याकडून आणि आशुकडून श्वेता तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आशूला फार व्यक्त होणं जमत नव्हतं त्यामुळे तुझं आमच्या आयुष्यात असणं किती मोलाचं आहे हे त्याने तुला कधीच सांगितलं नसेल. विशेषत: गेल्या वर्षभरात तुझी साथ महत्त्वाची ठरली. तु माझी बेस्ट फ्रेंड असूनही आशूला जज न करता समजून घेतलंस. नैराश्यासोबतच्या आमच्या प्रवासात तु नेहमीच आमच्या सोबत होती. तू एक रॉक सॉलिड पिलर नव्हतीस तर प्रवासातील महत्त्वाचा घटक होतीस,' असं मयुरी व्हिडिओमध्ये सांगतेय.

मयुरी पुढे सांगते, 'तुझ्याशिवाय आम्ही हे अनेक टप्पे कसे पार केले असते काय माहित? दुरून उपदेश न करता मैदानात उतरुन तू आमच्यासोबत हा लढा लढलीस. तु मैत्रीचा अर्थ पुन्हा नव्या दाखवून दिलास. तू अनेकदा आमच्यासाठी नागपूरहून मुंबईला आली आहेस. तुझ्या अशा लहान मोठ्या कृतीतूनच आमचा प्रवास सुसह्य झाला. मला माहित आहे, आपल्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. याचं दु:ख आम्हाला जितकं आहे तितकंच तुलाही आहे. पण मी हा व्हिडिओ करतेय कारण आपल्या भावना व्यक्त करणं महत्त्वाचं आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे खरे हिरो ओळखणं. ती तू आहेस श्वेता. एखाद्याचा त्रास समजून घेऊन त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची तुझी जी वृत्ती आहे, ही खूप महत्त्वाची आहे. याची मला आणि आशूला खूप मदत झाली. म्हणून आपल्या अपयशामुळे हताश होऊ नको. जगाला तुझ्यासारख्या माणसांची खूप गरज आहे.'

अभिनेता आशुतोष भाकरे याने 29 जुलै रोजी नांदेड मधील त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर आशुतोषच्या बर्थडे निमित्त छानसा केक बनवून मयुरीने एक भावूक पोस्ट त्याच्यासाठी लिहिली होती. 'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखने 20 जानेवारी 2016 ला आशुतोष भाकरेसोबत लग्न केलं होतं. आशुतोषने 'इच्यार ठरला पक्का' आणि 'भाकर' या दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर लॉकडाऊनपूर्वी मयुरीचं 'तिसरे बादशाह हम' हे नाटक रंगभूमीवर सुरु होतं.

mayuri first time share video and expressed after ashu left emotional post  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT