Mayuri Wagh in play aai ekvira devi role in ashirwad tuza ekvira aai serial on sony marathi  sakal
मनोरंजन

Mayuri Wagh: आई माऊलीचा उदो उदो!अभिनेत्री मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत..

'आशीर्वाद तुझा एकवीरा आई..' ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.

नीलेश अडसूळ

ashirwas tuza ekveera aai: नेहमी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मयूरी वाघ आता पुन्हा एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. या वेळी मयूरी वाघ एक वेगळी व्यतिरेखा साकारत आहे. प्रथमच ती दैवी भूमिकेत दिसणार आहे. सोनी मराठीवरील एका मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

(Mayuri Wagh in play aai ekvira devi role in ashirwad tuza ekvira aai serial on sony marathi )

मयूरी वाघ सोनी मराठी वरील 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या आगामी मालिकेत एकवीरा आईची व्यक्तिरेखा साकारणार आहे. नेहमी भक्तांच्या पाठीशी असणारी आई एकवीरा, भक्तांना त्यांचा संकटातून कशी तारून नेईल, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' हे या नव्या मालिकेचे नाव असून सोनी मराठी वाहिनी ही मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांचा भेटीला आला असून त्यात एकवीरा आईच्या वेषातील मयूरी वाघ प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे.

सोनी मराठी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मयूरी वाघ आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मयूरीव्यतिरिक्त या मालिकेत अमृता पवारही छोट्या पडद्यावर परत दिसणार आहे. संकटातून भक्तांना तारण्यासाठी येते आहे एकवीरा आई! या आधीही सोनी मराठीने अशा धाटणीची 'आई माझी काळूबाई' ही मालिका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT