maza hoshil na marathi serial zee Marathi channel sai and aditya romantic scene before marriage  
मनोरंजन

सई म्हणते,आदित्य मला साडी नेसवायला मदत कर; Video Viral 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  आदित्य आणि सईच्या लग्नाकडे प्रेक्षकांचे डोळे लागले होते. अखेर ते लग्न झाले. मात्र लग्नाच्या वेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये सई आदित्यला साडी नेसविण्यास मदत कर असे सांगत आहे. आतापर्यत त्या व्हिडिओला दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी त्यावर कमेंटही केली आहे. आदित्य आणि सईचा हटके लूक, त्यांची केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीस पडली आहे.

माझा होशील ना ही मालिका झी मराठी वाहिनीवर सुरु आहे. त्याचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून सई आणि आदित्यच्या लग्नाची चर्चा सुरु होती. ते कधी होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. त्या दोघांच्या लग्नात आलेले अडथळे त्यांनी त्यावर केलेली मात हा प्रवास प्रेक्षकांनी अनुभवल्यावर आता ते लग्नासाठी तयार झाले होते. सध्या त्या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झी चँनेलच्यावतीनेच तो प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यात सईनं आदित्यला साडी नेसविण्यासाठी मदत मागितली आहे. आदित्य तिच्या मदतीला गेला खरा. यापुढची गंमत तो व्हिडिओ पाहण्यामध्ये आहे.

सई आणि आदित्यची केमिस्ट्री कौतूकास्पद आहे. त्या दोघांच्या अभिनयानं या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आली लग्न घटी समीप नवरा, आदी सईचा जोडा शोभतो खरा. अशी कॅप्शन त्या व्हिडिओला दिली आहे. आदित्य आणि सईच्या लग्नाअगोदरचा हा व्हिडिओ आहे. मला साडी नेसवायला मदत कर असे सई आदित्यला सांगते.

 तेव्हा आदित्य भांबावून गेला आहे. अशावेळी काय करावं हे त्याला कळत नाही. तो लाजत आणि घाबरत सईच्या जवळ जातो आणि तिला साडी नेसविण्यासाठी त्याला मदत करते. यानंतर पदराला पीन लावून देण्यासाठीही ती त्याला गळ घालते. तेव्हाही आदित्य तिला मदत करतो. असे त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT