prarthana Behere Google
मनोरंजन

'माझी तुझी रेशीमगाठ' मधील नेहानं टाकली कात,बनली 'बार्बी डॉल'

प्रार्थना बेहरेच्या या लूकवर चाहते मात्र फिदा आहेत.

प्रणाली मोरे

सध्या 'झी मराठी' वाहिनीवर सुरु असलेली टीआरपी जास्त असणारी मालिका म्हणून 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेकडं पाहिलं जातं. याचं क्रेडिट जातं ते स्टार अभिनेता श्रेयस तळपदे,गोड दिसणारी प्रार्थना बेहरे(Prarthana Behere) आणि चिमुकल्या परीची भूमिका साकारणाऱ्या मायराला. या मालिकेतील प्रार्थना आणि मायरा म्हणजेच नेहा आणि परी या दोघीही सोशल मीडियावर सर्वात अधिक सक्रिय असतात. परी म्हणजे मायरा तर मूळची यूट्युबर म्हणून प्रसिद्ध. पण आता प्रार्थना बेहरे मात्र बाजी मारण्याच्या विचारात दिसतेय. सध्या 'न्यू मी' या टॅगखाली ती जे काही नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतेय त्यानं तिच्या फॅन फॉलॉइंगची लिस्ट मात्र वाढताना दिसतेय.

'माझी तुझी रेशीमगाठ' मधील साधी-सोज्वळ दिसणारी नेहा प्रेक्षकांना आवडतेच आहे,पण मॉर्डन ड्रेसमधील प्रार्थनाला देखील तितकंच पसंत केलं जाताना दिसत आहे. प्रार्थनाची एक व्हिडीओ रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यात तिनं गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. पण या ड्रेसमध्ये लक्ष वेधून घेतलं आहे ते तिच्या ड्रेसवर लिहिलेल्या 'बार्बी' या नावानं.

ती या व्हिडीओ रीलमध्ये मस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही खूश होऊन भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण कुणीतरी एकानं मुद्दाम खोडी काढत म्हटलंय कसं,''बार्बीचा रेनकोट घातलाय का?'' काहीही म्हणा,पण प्रार्थना बेहरेची बातच और आहे. सध्या मालिकेतही यश-नेहाच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु होण्याच्या दिशेनं प्रवास होतोय. सध्या मालिकेत आलेल्या परदेशी बाला मुळे भलतीच धम्माल येतेय. नेहा आता यशसमोर आपलं प्रेम व्यक्त करणार आहे. कदाचित या महत्त्वाच्या ट्रॅकसाठी तर नेहानं म्हणजे प्रार्थनानं हा पेहराव तर नाही केला नं. म्हणजे यशच्या त्या परदेशी मैत्रिणीसमोर उठून दिसण्यासाठी नेहानं हा ड्रेस मालिकेत घातला नाहीनं अशीही चर्चा होऊ लागलीय. असो 'बार्बी डॉल' मात्र आवडली राव सगळ्यांना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

Dilshad Mulla OBC Caste Certificate Invalid : 'काँग्रेस'च्या दिलशाद मुल्ला यांचा ओबीसी जातीचा दाखला ठरविला अवैध; नगरसेवकपद धोक्यात, मुल्ला उच्च न्यायालयात मागणार दाद

Tiger Spotted in Chandgad : चंदगडमध्ये थरार! तेऊरवाडी-हडलगे मार्गावर रात्रीच्या वेळी चालत्या गाडीसमोर आला वाघ; नागरिकांमध्ये मोठी दहशत

Pune News: सिंहगड संस्थेला पुन्हा दणका ;आणखी २५ महाविद्यालयांवर प्रशासकाची नेमणूक

SCROLL FOR NEXT