mc stan and kapil sharma
mc stan and kapil sharma Sakal
मनोरंजन

The Kapil Sharma Show: एमसी स्टॅन आणि कपिल शर्माच्या धमाकेदार डान्स व्हिडिओनं तोडले रेकॉर्ड! काही तासातच...

सकाळ डिजिटल टीम

सोनी चॅनेलवर येणारा 'द कपिल शर्मा शो' हा शो प्रेक्षकांना हसवण्यात नेहमीच यशस्वी ठरतो. प्रत्येक वीकेंडला या शोमध्ये नवीन स्टार्स येतात. लवकरच 'बिग बॉस 16' चा विजेता एमसी स्टॅन देखील शोमध्ये दिसणार आहे. या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये स्टॅन आणि कपिल शर्मा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.

एमसी स्टॅन 'द कपिल शर्मा शो'मध्ये गेस्ट म्हणून दिसणार आहे. शोमध्ये येताना तो स्टेजवर त्याचे रॅप गाणे गाऊन दहशत निर्माण करेल. कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये स्टॅन रॅप सॉंग गाताना दिसत आहे. त्याचवेळी कपिल स्टॅनच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी स्टॅन लाल रंगाच्या लूकमध्ये दिसला. कपिलनेही फंकी लूक कॅरी केला आहे.

कपिल आणि स्टॅनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर चाहते त्याचा हा एपिसोड पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. कपिलने कॅप्शनमध्ये लिहिले,“क्या बोलती पब्लिक? वाइब है की नहीं? लव यू ब्रो.”

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अल्पावधीतच या व्हिडिओने व्ह्यूजचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आतापर्यंत 2,875,289 लोकांनी याला लाईक केले असून 44 हजार लोकांनी कमेंट केल्या आहेत.

आजकाल एमसी स्टॅनची जादू सर्वत्र आहे. रॅपने जगाला वेड लावणाऱ्या एमसी स्टॅनने 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर अधिक लोकप्रियता मिळवली आहे. त्याची फॅन फॉलोइंगही खूप मजबूत आहे.

शाहरुख खानपासून विराट कोहलीपर्यंत त्याने लोकप्रियतेत मागे टाकले आहे. स्टॅन सोशल मीडियावरही ट्रेंड करत आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी एमसी स्टॅनने खूप नाव कमावले आहे. पुण्याचा रहिवासी अल्ताफ शेख उर्फ ​​स्टॅन याने बी-टाऊन स्टार्सनाही आपले वेड लावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT