Dr, Vasantrao Deshpande & Rahul Deshpande Google
मनोरंजन

1 एप्रिलला सिनेमागृहात रंगणार सुरांची मैफिल; 'मी वसंतराव' भेटीला...

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत व्यक्त केल्या भावना

प्रणाली मोरे

ज्येष्ठ संगीतकार-गायक डॉ.वसंतराव देशपांडे (Dr.Vasantrao Deshpande) हे शास्त्रीय संगीतातलं मोठं नाव. महान गायक,मराठी संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनेते ज्यांनी आपल्या अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बंदिश,ठुमरी,नाट्यसंगीत,चित्रपट संगीत या सर्व गाण्यातील प्रकारांना त्यांनी आत्मसात करीत त्यावर आपला ठसा उमटवला. त्यांच्या 'कट्यार काळजात घुसली' या नाटकामुळे त्यांचं नाव सर्वदूर झालं. त्यांच्याबाबतीत आणखी एक विशेष गोष्ट आवर्जुन सांगाविशी वाटते ती म्हणजे,वर्ष १९६७ साली 'कट्यार काळजात घुसली' या नाटकाचा पहिला प्रयोग झाला व याच नाटकातील 'खॉंसाहेब' ही व्यक्तिरेखा रसिकांच्या मनात इतकी भरली की त्यांना पु.ल.देशपांडे यांनी 'वसंतखॉं' देशपांडे ही बिरुदावली बहाल केली. अशा दिग्गज डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव 'हा बायोपिक जाहिर झाला तेव्हा अनेक रसिकांना परमानंद झाला होता. आता अनेक अडचणींनतर लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं. मात्र या सिनेमाचा दिग्दर्शक निपुण अधिकारी यानं सोशल मीडियावरील आपल्या पोस्टच्या माध्यमातून अखेर सिनेमा आता नवीन वर्षात १ एप्रिलला सिनेमागृहात भेटीस येत असल्याची घोषणा केली आहे.

निपुण धर्माधिकारी हा एक उत्तम दिग्दर्शक आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘धप्पा’आणि ‘भाडिपा’सारखी उत्तम कलाकृती जी जन-मानसात लोकप्रिय आहे, त्यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव त्याच्या गाठी जमा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून गायक राहुल देशपांडे आपले आजोबा डॉ.वसंतराव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. राहुलच्या गायकी अन् अभिनयावर आजोबांची छाप आहे असं बोललं जातं. आता थेट आजोबांचीच व्यक्तिरेखा साकारताना मोठ्या पडद्यावर त्याला पाहणं लोकांसाठी पर्वणी म्हणावी लागेल. या सिनेमाच्या पोस्टरवर दिसणारा राहूल हा हुबेहूब वसंतराव देशपांडें सारखा दिसल्याचा भास होत आहे जणू.

डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर सिनेमा काढण्याचं स्वप्न निपुण धर्माधिकारी आणि राहूल देशपांडे यांनी मिळून पाहिलं होतं. स्वतः राहूलनं एका मुलाखतीत याविषयी सांगितलं होतं. तब्बल ९ वर्षांच्या त्या स्वप्नाची आता पूर्तता होत आहे,नवीन वर्षांची सुरुवात उत्तम होणार असं सोशल मीडियावर निपुण धर्माधिकारी यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या सिनेमात अनिता दाते,अमेय वाघ,कौमुदी वालोकर,पुष्कराज चिरपुटकर असे कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता जिओ स्टुडिओज् आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT