Meera Chopra Wedding News esakal
मनोरंजन

Meera Chopra Wedding : प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्राचं 'शुभमंगल सावधान'! उद्योगपती रक्षितसोबत बांधली लग्नगाठ

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका चोप्राच्या बहिणीच्या मीराच्या (Meera Chopra Wedding ) लग्नाची चर्चा होती.

युगंधर ताजणे

Meera Chopra and Rakshit Kejriwal Wedding : बॉलीवूडसह हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंकाचा दरारा मोठा आहे. ती एक ग्लोबल आयकॉन असणारी सेलिब्रेटी आहे. अशातच प्रियंकाच्या घरातून एक मोठी बातमी समोर आली आहे.तिची चुलत बहीण मीरा चोप्राचं शुभमंगल झालं आहे. उद्योगपती रक्षित केजरीवाल याच्यासोबत तिनं लग्नगाठ बांधली आहे.

परिणीती चोप्रानंतर मीरा चोप्राचं लग्न चर्चेत आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं होतं. गुजरामध्ये या सेलिब्रेटींचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिला तिच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मीराच्या लग्नात तिचे जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होते. मोजक्या पाहुण्या मंडळीच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला आहे. त्या लग्नामध्ये प्रियंका किंवा परिणीती चोप्रा हजर होते किंवा नाही याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ते उपस्थित असल्याचे फोटोही व्हायरल झालेले नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूर दिल्ली हायवे जवळील एका लक्झरी गार्डन स्पा रिसॉर्टमध्ये त्यांचे लग्न पार पडले आहे.

११मार्च रोजी मीराचा मेहंदी आणि हळदीचा सोहळा पार पडला होता. त्यात तिचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. यावेळी संदीप सिंह, आनंद पंडित, अर्जन बाजवा आणि गौरव चोप्रा सहभागी असल्याची माहिती आहे. मीरानं देखील तिच्या इंस्टावरुन लग्नाचे फोटो शेयर केले आहेत. त्यानंतर बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. चाहत्यांनी देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं म्हटलं आहे की, मीरा तुला तुझ्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...

रक्षित केजरीवाल आहे तरी कोण?

मीराचा पती रक्षित केजरीवाल हा सीए आहे. त्यानं कोलंबिया विद्यापीठातून फायनान्स आणि स्ट्रॅटजीमध्ये एमबीए केले आहे. २०१५ मध्ये त्यानं स्ले कॉफी लाँच केली होती. त्यानंतर तो त्या कंपनीचा को फाउंडरही झाला. सोशल मीडियावर रक्षितच्या नावाची मोठी क्रेझ आहे. मीराला आर्टिकल ३७५ नावाच्या चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

Pune Bhavani Peth Crime News: भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय तरुणाचा खून; खडक पोलिसांकडून चौघांना अटक

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

SCROLL FOR NEXT