meera joshi disclosed her wedding date with boyfriend nehul warule in social media SAKAL
मनोरंजन

Meera Joshi: बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत लग्नाची तारीखच सांगितली, मराठमोळ्या मीरा जोशीचा खुलासा

अमृता - प्रसाद नंतर मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीने बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत लग्नाची तारीख सांगितली

Devendra Jadhav

अगदी काहीच दिवसांपुर्वी अमृता देशमुश - प्रसाद जवादे या दोघांनी गुपचुप साखरपुडा करुन थेट लग्नाची तारीख जाहीर करुन सर्व फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला.

आता अमृता - प्रसाद नंतर मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीने सोशल मिडीयावर मिडीयावर सर्वांसोबत आनंदाची बातमी शेअर केलीय. मीराने बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत थेट लग्नाची तारीख सर्वांना सांगितली आहे.

(meera joshi disclosed her wedding date with boyfriend nehul warule in social media)

या तारखेला मीराचा बॉयफ्रेंड सोबत लग्न करणार?

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे नेहुल वारुळे. नेहुल हा अभिनेता आणि डान्सर असल्याचं समजतंय. नेहुलने स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार या शोचं विजेतेपद पटकावलं होतं.

त्यावेळी सचिन पिळगावकर, अशोक सराफ या मान्यवरांच्या हस्ते त्याचा सन्मान झाला होता. नेहुल आणि मीरा किती दिवसांपासुन रिलेशनशीपमध्ये आहेत याचा खुलासा झाला नाहीय. हे दोघे ५ सप्टेंबर २०२३ ला लग्न करणार असल्याचं समजतंय

मीराने केला होता बॉयफ्रेंडचा खुलासा

मीरा काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. आपण प्रेमात पडल्याचं तिने सांगितलं आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटोही शेअर केले होते. या फोटोत समुद्रकिनाऱ्यावर उभे आहेत. तर तिचा बॉयफ्रेंड पाठमोरा उभा आहे. तिने त्याचा चेहरा दाखवला नसल्याने तो नेमका कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.

मीराने उरण समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो शेअर केले आहेत. तिने तिच्या प्रियकराचा चेहरा आणि नाव गुदस्त्यात ठेवलं असलं तरी चाहते तिच्यासाठी प्रचंड आनंदी आहेत.

मीराचा नवीन घरात गृहप्रवेश

मीराने सोशल मिडीयावर काही फोटो पोस्ट केलेत. या फोटोत मीराचा भाऊ सलील जोशी, आई स्मिता जोशी आणि तिचे बाबा दिसत आहेत.

मीराने पुण्यातील नवीन घरात पुजा करत गृहप्रवेश केलाय. मीराच्या हातात कलश दिसुन येतोय. नवीन घर घेतल्याने मीरा आणि तिचं संपूर्ण कुटुंब खुप आनंदात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT