meezan navya 
मनोरंजन

नव्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर जावेद जाफरीच्या मुलाने सोडलं मौन

मिझान जाफरी आणि बिग बींची नात नव्या यांच्या अफेअरच्या चर्चा

स्वाती वेमूल

गेल्या काही वर्षांपासून अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिझान जाफरी Meezaan Jafferi आणि अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांची नात नव्या नवेली नंदा Navya Naveli Nanda यांच्या अफेअरच्या चर्चा आहेत. या दोघांनी या चर्चांना नाकारलं आणि आम्ही फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असं माध्यमांना स्पष्ट केलं. मात्र या चर्चांमुळे मिझानला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं, याचा खुलासा त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. नव्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे मिझानला बच्चन कुटुंबीयांच्या 'जलसा' बंगल्यावर जातानाही संकोचलेपणा वाटल्याचं त्याने सांगितलं. (Meezaan Jafferi opens up on link up rumours with Amitabh Bachchans granddaughter Navya Naveli Nanda)

'मी माझ्या मलाल या चित्रपटाचं प्रमोशन करत होतो आणि त्यावेळी नव्यासोबतच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. पण खरंच, मी आणि नव्या एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. माझ्यामुळे तिचं नाव अनेक ठिकाणी घेतलं जातंय, जे मला खूप चुकीचं वाटतंय. कारण ते तिचं वैयक्तिक आयुष्य आहे. तिच्या कुटुंबालाही यात समाविष्ट करण्याची काही गरज नाही. पापाराझींना माझी गाडी कोणती आहे आणि त्याचा नंबर कोणता आहे याची माहिती होती. त्यामुळे जलसा बंगल्यावर जाणंही माझ्यासाठी कठीण होतं', असं मिझान म्हणाला.

जावेद जाफरी यांनीसुद्धा मिझानला अफेअरबाबत प्रश्न विचारल्याचं त्याने सांगितलं. 'कधी कधी तर मला माझ्या घरी जायलासुद्धा संकोचलेपणा वाटत होता. कारण माझ्या आईवडिलांनाही प्रश्न पडला की, आमच्यात नेमकं काय शिजतंय? खरं सांगायचं झालं तर मलाही माहित नाही, या सर्व चर्चा कशा सुरू झाल्या. मी दिवाळी पार्टीच्यावेळी जलसा बंगल्यावर गेलो होतो. त्यावेळी इंडस्ट्रीतील बरेच कलाकार तिथे उपस्थि होते', असं तो पुढे म्हणाला.

मिझानने २०१८ साली 'मलाल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या प्रमोशनपासूनच नव्या आणि मिझानच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. नव्या ही मिझानच्या बहीणची खास मैत्रीण आहे. मिझान लवकरच 'हंगामा २' या चित्रपटात झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT