megha dhade Instagram
मनोरंजन

'बिग बॉस मराठी १' विजेती मेघा धाडेनं केला नैराश्याचा सामना; सतत यायचे पॅनिक अटॅक्स

काम बंद झाल्याने, काही प्रोजेक्ट्स रखडल्याने अनेक कलाकारांना नैराश्याला सामोरं जावं लागलं.

स्वाती वेमूल

कोरोना महामारी आणि लॉकडाउन यांमुळे शूटिंग बंद झालं. काम बंद झाल्याने आणि काही प्रोजेक्ट्स रखडल्याने अनेक कलाकारांना नैराश्याला सामोरं जावं लागलं. 'बिग बॉस मराठी'चं Bigg Boss Marathi पहिलं सिझन जिंकणारी अभिनेत्री मेघा धाडेनंसुद्धा Megha Dhade नैराश्याचा सामना केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मेघा याविषयी मोकळेपणाने व्यक्त झाली. (Megha Dhadhe opens up about getting panic attacks and depression during pandemic)

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत मेघा म्हणाली, "मागचा महिना माझ्यासाठी खूप कठीण होता, कारण मला सारखे पॅनिक अटॅक्स येत होते. आजूबाजूच्या परिस्थितीला पाहून मला सतत चिंता सतावत होती. काही गोष्टींचा माझ्यावर भावनिकदृष्ट्या फार लवकर परिणाम होतो. एखाद्याने जवळची व्यक्ती गमावली असेल तर त्यांना पाहून मीसुद्धा खचून जायचे. कोरोना महामारीचा सामना करताना ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं, त्यांच्या दु:खाविषयी तर मी विचारसुद्धा करू शकत नाही."

नैराश्याचा सामना करण्यासाठी मेघाने तिच्या परीने काही उपाययोजना केल्याचं सांगितलं. "मी जवळच्या मित्रमैत्रिणींना फोन करून त्यांच्याशी बोलू लागले. एखाद्याशी बोलून मन मोकळं होतं. मला लोकांशी बोलायची सवय असल्याने नैराश्याचा सामना करताना ही गोष्ट फार उपयोगी पडली. मी खूप साहसी, धाडसी आहे असं मला वाटायचं. मी लवकर खचून जाणार नाही, असा माझा समज होता. पण या काळाने मला खूप काही शिकवलं. कठीण परिस्थितीत आपल्याला एकमेकांची काळजी घ्यायला हवी", असं ती पुढे म्हणाली.

मेघा धाडेनं 'बिग बॉस मराठी'चं पहिलं पर्व गाजवलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही मेघा सोशल मीडियावरील तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे सतत चर्चेत असायची. मेघा लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्याने ती कमी वयात आई झाली. या काळातही तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मेघाला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT