meghana jadhav birthday ravi jadhav and her filmy lovestory  sakal
मनोरंजन

Ravi Jadhav: दिग्दर्शक रवी जाधवच्या बायकोचा बर्थडे.. पक्की फिल्मी आहे दोघांची लव्हस्टोरी..

दिग्दर्शक रवी जाधवची पत्नी मेघनाचा आज बर्थडे..

नीलेश अडसूळ

ravi jadhav lovestory: नटरंग, बालगंधर्व, न्यूड, टाइमपास असे दर्जेदार चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टीची मान अभिमानाने उंचवणारा दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. जाहिरात जगतातून चित्रपटाकडे आलेल्या या दिग्दर्शकाने मराठी सिनेमात नावीन्यपूर्ण आशय आणला.

विशेष म्हणजे त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळ्या धाटणीचा बाज आणि विषय घेऊन पुढे आला. अगदी राष्ट्रीय पुरस्करापर्यन्त त्यांनी झेप घेतली. त्यांच्या 'टाइमपास' चित्रपटाची तरुणाई अक्षरशः दिवानी आहे.

अशी भन्नाट प्रेमकथा त्यांनी आपल्या चित्रपटातून साकारली, तशी भन्नाट लव्हस्टोरी त्यांची स्वतःची देखील आहे. आज त्यांच्या बायकोचा म्हणजे मेघना जाधव यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने पाहूया ही खास लव्हस्टोरी..

(meghana jadhav birthday ravi jadhav and her filmy lovestory )

रवी जाधव यांची पत्नी मेघना जाधव यांची लव्हस्टोरी देखील भन्नाट आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मेघाना या रवी यांच्या मित्राची बहीण. मित्राच्या घरी जावून जावून त्यांचे मेघनाशी सूत जुळले.

मित्राला भेटायच्या निमित्ताने ते मेघनाला पाहायला तिच्या घरी जात असत. असे करता करता दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी रवी जाधव यांनी मेघना यांना प्रपोज केले होते.

त्यानंतर मेघना यांनी पुरेपूर वेळ घेतला आणि एक महिन्याने यांनी होकार कळवला जेव्हा रवी जाधव प्रेमात पडले होते तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. पण केवळ रवी जाधव काहीतरी वेगळं करू शकतील या विश्वासावर त्यांनी रवी यांना होकार दिला.

पण हे इतकं सोप्पं नव्हतं. रवीच्या यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती त्यात मेघनाच्या वडिलांना रवी-मेघना यांच्या अफेअरबद्दल कळाले तेव्हा एक अट घातली.

स्वतःचे घर घ्या, तरच तिच्याशी लग्न करण्याची परवानगी देतो अशी अट त्यांनी घातली. ही अट मान्य करत रवी जाधव यांनी काटकसर करत स्वतःचे घर उभे केले आणि मग मेघनाशी लग्न केले.

सुरुवातीला मेघना शिक्षक म्हणून काम करत होत्या तर रवी जाधव जाहिरात एजेंसी मध्ये होते. दोघांनीही अगदी शून्यातून आपल्या संसाराची सुरुवात केली. जेव्हा रवी यांनी नोकरी सोडून चित्रपट करण्याचा विचार केला तेव्हा मेघना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आणि आज जो इतिहास घडला तो आपल्या डोळ्यांनपुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT