Sonam Kapoor Google
मनोरंजन

सोनम कपूरच्या घरी चोरी झाल्याचे समजताच सोशल मीडियावर मजेदार मीम्स व्हायरल

सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांच्या दिल्ली येथील घरात चोरी झाल्याचं प्रकरण आज उघडकीस आलं आहे.

प्रणाली मोरे

सोनम कपूर आणि आनंद कपूर यांच्या दिल्ली येथील घरात चोरी झाल्याची घटना समोर आली तोच सोशल मीडियावर या घटनेवरचे मजेदार मीम्स पडायला सुरुवात झाली. सोनमच्या घरच्या चौरीची चौकशी दिल्ली पोलिस आणि एफएसएल दोघं मिळून करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १.४१ करोड रुपयांची ज्वेलरी आणि रोख रक्कम चौरांनी लंपास करीत मोठाच डल्ला मारला आहे. मीडियाच्या माहितीनुसार सोनमची सासू आपला मॅनेजर रितेश गौरासोबत जाऊन तुगलक रोड पोलिस्टेशनात तक्रार नोंदवून आली होती. पण हायप्रोफाईल केस असल्याकारणानं अद्याप ही केस लपवण्याचा प्रयत्न केला जात होता.

पण अखेर आज या चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सोनम कपूरला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली. ट्रोलर्सनी सोनम कपूरच्या घरी झालेल्या चोरीवरनं तिची मजा-मस्करी करणारे मीम्स सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जे मोठ्या गतीनं व्हायरलही झाले आहेत. यामध्ये अक्षय कुमार,सुनिल शेट्टी,परेश रावल यांच्या 'हेराफेरी' सिनेमातला एक डायलॉग वापरुन तयार केलेला मीम भलताच पसंतीस उतरतोय. तर सोनमच्याच 'अभी तो पार्टी शुरू होई है' गाण्याचा वापर करुनही मीम पोस्ट करण्यात आलं आहे.

तक्रारीनंतर पोलिसांनी सोनम आणि आनंद अहूजाच्या घरातील लूटल्या गेलेल्या पैशाचा तपास घेण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फूटेजही चेक करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यातही, सोनमच्या सासऱ्यांना २७ करोडचा गंडा लावण्यात आला होता. या केसचीही भलतीच चर्चा रंगली होती. या प्रकरणात आतापर्यंत दहा लोकांना अटक करण्यात आली आहे. सध्या सोनम कपूर आणि आनंद अहूजा मुंबईत आहेत. लवकरच सोनम एका बाळाला जन्म देणार आहे. सध्या ती आपल्या वडीलांच्या घरी असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT