merry christmas and hanuman day 1 box office report  SAKAL
मनोरंजन

Merry Christmas - Hanuman: 'मेरी ख्रिसमस' की 'हनुमान'? कोणी मारली पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर बाजी

'मेरी ख्रिसमस' - 'हनुमान'चा बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय

Devendra Jadhav

Merry Christmas - Hanuman Box Office Report News: या शुक्रवारी १२ जानेवारीला 'हनुमान' आणि 'मेरी ख्रिसमस' हे दोन सिनेमे रिलीज झालेत. या दोन्ही सिनेमांची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु होती.

अशातच मेरी ख्रिसमस आणि हनुमान या दोघांचा बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. हे रिपोर्ट पाहता हनुमानची गदा मेरी ख्रिसमसवर भारी पडतेय, असं म्हणता येईल.

मेरी ख्रिसमसचा बॉक्स ऑफीस रिपोर्ट

विजय सेतुपती आणि कतरिना कैफ स्टारर 'मेरी ख्रिसमस' रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने कतरिना आणि विजयची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची सुरुवात संथ झाली आहे.

मेरी ख्रिसमसने पहिल्याच दिवशी 2 कोटी 55 लाखांचा व्यवसाय केला आहे. बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी चित्रपटाला शनिवार आणि रविवारी चांगला व्यवसाय करावा लागणार आहे.

हनुमानची कमाई

दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा 'हनुमान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने शानदार ओपनिंग घेतली आहे. याला समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडला आहे.

चित्रपटगृहांमध्ये ‘जय श्री राम’ आणि ‘जय बोलो हनुमान की’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. अभिनेता तेजा सज्जाच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.56 कोटींची कमाई केली आहे.

प्रभासचा सालार हा चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सालारने 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने 22 व्या दिवशी 60 लाखांचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाने एकूण 402.40 कोटींची कमाई केली आहे.

त्यामुळे बॉक्स ऑफीसकडे पाहता साऊथ सिनेमांना पुन्हा एकदा लोकांची पसंती मिळाली असून मेरी ख्रिसमसकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT