Merry Christmas Hindi Trailer Vijay Sethupathi Katrina Kaif Sriram Raghavan  SAKAL
मनोरंजन

Merry Christmas Trailer: अंधाऱ्या रात्रीची रहस्यमयी कहाणी, कतरिना - सेथुपतीच्या 'मेरी ख्रिसमस'चा ट्रेलर बघाच

विजय सेथुपती - कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमस सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय.

Devendra Jadhav

Merry Christmas Trailer: अवघ्या काहीच दिवसांमध्ये नाताळचा सण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाताळ अर्थात ख्रिसमसची सर्वांना उत्सुकता असते. अशातच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर आगळीवेगळी कथा असलेल्या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्याचं नाव मेरी 'ख्रिसमस'.

विजय सेथुपती - कतरिना कैफ स्टारर 'मेरी ख्रिसमस' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. एका रात्रीची रहस्यमयी कहाणी या ट्रेलरमधून पाहायला मिळतेय.

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर MERRY CHRISTMAS हिंदी आणि तमिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या हिंदी आवृत्तीमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिन्नू आनंद यांसारख्या कलाकार झळकणार आहेत. तर तमिळ आवृत्तीमध्ये राधिका सरथकुमार, षणमुगराजा, काविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स हे दिग्गज कलाकार आहेत. राधिका आपटे आणि अश्विनी काळसेकर यांचा दोन्ही आवृत्त्यांमध्ये खास कॅमिओ आहेत.

वरुण ग्रोव्हर लिखित प्रीतमने संगीतबद्ध केलेली गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील. अंंधाधून या ब्लॉकबस्टर सिनेमाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी मेरी ख्रिसमसचे दिग्दर्शन केलंय.

एका रात्रीत घडणाऱ्या रहस्यमयी घटनांची मालिका मेरी ख्रिसमसमध्ये बघायला मिळणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरला अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय.

रमेश तौरानी, संजय रौत्रे, जया तौरानी आणि केवल गर्ग निर्मित आणि श्रीराम राघवन दिग्दर्शित, ‘मेरी ख्रिसमस’ हा टिप्स फिल्म्स आणि मॅचबॉक्स पिक्चर्स यांच्यातील पहिला सहयोग आहे. ॉ

उच्च-गुणवत्तेचे मनोरंजन देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसह, प्रेक्षक चित्रपटांमध्ये खरोखरच आकर्षक राइडची अपेक्षा करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT