Met Gala 2023
Met Gala 2023 esakal
मनोरंजन

Met Gala 2023 : जगातील सगळ्यात मोठा फॅशन इवेंट इतका खास का असतो? जाणून घ्या इवेंटच्या रंजक गोष्टी

साक्षी राऊत

Met Gala 2023 : मेट गाला हा जगातील सर्वात लोकप्रिय फॅशन इव्हेंटपैकी एक आहे. यावेळी मेट गाला १ मे रोजी सुरू झालाय. न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये फॅशनचा सर्वात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. यंदाचा मेट गाला आणखी खास होता. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच मेट गालाच्या रेड कार्पेटवर चालताना दिसली. त्याच्यासोबत ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा देखील दिसली. मेट गालाचे नाव ऐकल्यानंतर, आपण विचार करत असाल की हा फॅशन इव्हेंट इतका खास का आहे आणि त्याचा इतिहास काय आहे? चला तर याबाबत सविस्तरजाणून घेऊया.

यावेळी इवेंटसाठी कार्ल लेजरफेल्ड – ए लाइन ऑफ ब्युटी ची थीम ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये या महान फॅशन डिझायनरचे कार्य आणि जीवन साजरे केले जाईल. मेट गालामध्ये त्यांच्या आवडत्या स्टार्सला पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. ज्यामध्ये या महान फॅशन डिझायनरचं काम आणि जीवनातील रंजक गोष्टी सेलिब्रेट केल्या जातील.चाहेतसुद्धा त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीजला मेट गाला इवेंटमध्ये बघण्यासाठी उत्सुक आहेत.

जाणून घ्या मेट गालाबाबत काही गोष्टी

मेट गाला हा न्यूयॉर्क शहरातील सगळ्यात मोठा चॅरिटी इवेंट आहे. मेट बॉल ज्याला सहसा कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला किंवा कॉस्च्युम इन्स्टिट्यूट बेनिफिट म्हणून संबोधले जाते, हा मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमधील कॉस्च्युम इन्स्टिट्यूटला फायदा होण्यासाठी मॅनहॅटनमधील अण्णा विंटूर यांनी आयोजित केलेला निधी उभारणारा कार्यक्रम आहे. व्यवसाय, मनोरंजन, क्रीडा, पत्रकार आणि राजकारण क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना या इवेंटमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. पण त्याचे तिकीट कोणालाच मिळू शकत नाही. मात्र जर तुम्ही सेलिब्रिटी नसाल तर तुम्हाला त्याच्या तिकिटासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. (Fashion)

मेट गालाचा इतिहास माहितीये?

मेट गालाची सुरुवात 1948 साली फॅशन पब्लिसिस्ट एलेनॉर लॅम्बर्ट यांनी केली होती. त्या वेळी स्थापन झालेल्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारणे हा त्यांचा उद्देश होता. तेव्हापासून मेट गाला आयोजित करणे ही एक परंपरा बनली आहे. मेट गाला दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. हा न्यूयॉर्क शहरातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याने, मेट गालाने 2019 मध्ये अंदाजे $200 मिलीयन जमा केले. विशेष म्हणजे यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT