मनोरंजन

मिया खलिफाचा वर्षभरात घटस्फोट; इन्स्टाग्रामवरून केलं जाहीर

मिया खलिफाचा वर्षभरात घटस्फोट; इन्स्टाग्रामवरून केलं जाहीर वाचा, नक्की काय आहे तिची पोस्ट Mia Khalifa Announces Divorce With Husband Robert Sandberg See Instagram Post vjb 91

विराज भागवत
  • वाचा, नक्की काय आहे तिची पोस्ट

अडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील बरेचदा चर्चेत असलेलं नाव म्हणजे मिया खलिफा (Mia Khalifa). आधी पॉर्नस्टार (Former Pornstar) असलेली आणि नंतर क्रीडा समालोचक (Sports Commentator) म्हणून करियर घडवणारी मिया हिने लग्नानंतर काही दिवसांत घटस्फोटाचा निर्णय केला.

पाहा तिची पोस्ट-

पती रॉबर्ट सँडबर्गशी घटस्फोट घेण्याचा निर्णय तिने इन्टाग्रामवरून पोस्ट लिहून जाहीर केला. १२ जून २०२० ला तिने रॉबर्टशी लग्नगाठ बांधली असल्याची माहिती मिळाली होती. मात्र वर्षभरातच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिल्यानंतर मियाने या पोस्ट खालील कमेंट्स बंद करून ठेवल्या आहेत.

खलिफा आणि व्यवसायाने शेफ असलेला तिचा पती सँडबर्ग यांनी मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसोबत लग्नाच्या अनेक योजना आखल्या होत्या. त्याबद्दल मियाने अनेकदा इंस्टाग्रामवर बरीच चर्चा केली होती. त्यांनी २०१९ ला साखरपुडा केला तर २०२० मध्ये त्यांचा जंगी लग्नाचा कार्यक्रम होणार होता. पण कोरोनामुळे त्यांनी घरच्या घरी साधेपणाने लग्न करावे लागले.

लग्नाचे एक मोठे रिसेप्शन लवकर दिले जाईल असं ती वारंवार सांगत होती. पण अखेर वर्षभराच्या संसारानंतर २२ जुलै २०२१ ला तिने इन्स्टाग्रामवरून तिच्या घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला. ती आणि तिचा पती सँडबर्ग परस्पर सामंजस्याने विवाहबंधनातून मुक्त होत असून ते दोघे आयुष्यभर मित्रत्वाचे नाते टिकवून ठेवतील असेही मियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT