Mika Di Vohti winner : Mika Singh choses akanksha puri as his life-partner sakal
मनोरंजन

आकांक्षा सिंग झाली मिकाची नवराई.. 12 वर्षांची मैत्री आणि मग स्वयंवर..

मिकाने पत्नीची निवड करण्यासाठी थाटलेला लग्नाचा सोहळा अखेर संपन्न झाला आहे.

नीलेश अडसूळ

Mika Di Vohti winner akanksha puri : गेले काही दिवस टीव्ही मनोरंजन विश्वात मिकाच्या स्वयंवराची जोरदार चर्चा सुरु होती. मिकानं लग्न करण्यासाठी थेट स्वयंवरच थाटले. आपल्याला कशी बायको हवी यासाठी त्याने स्टार भारत या वाहिनीवर एक शो सुरु केला आणि बघताबघता त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 'मिका दी वोट्टी' या नावानं (tv entertainment news) सुरू झालेल्या शोला प्रेक्षकांची डोक्यावर घेतले. या शो बाजी मारून मिकाच्या गळ्यात कोण हार घालणार याची उत्सुकता साऱ्यांना होती. अखेर नुकत्याच झालेल्या स्वयंवराच्या सांगता सोहळ्यात मिकाने आपल्या जोडीदाराची निवड केली. या स्वयंवरात आकांक्षा पुरी हीन मिकाच्या काळजात स्थान मिळवलं. (entertainment trending news)

(Mika Di Vohti winner : Mika Singh choses akanksha puri as his life-partner)

आकांक्षा पुरी आणि मिका यांच्या केमिस्ट्रीनं गेल्या काही दिवसात मनोरंजन विश्वाचं लक्ष वेधून (bollywood news) घेतलं होतं. आकांक्षा पुरी, प्रांतिका दास आणि नीत महल या तीन मुली अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. तिघींनीही आपआपल्या बाजूने मिकाला जिंकण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण मिका आणि आकांक्षाची केमिस्ट्री पहिल्या पासूनच दिसून येत होती. तो आकांक्षाची निवड करेल, असा अंदाज देखील चाहत्यांनी बांधला होता, अखेर तो खरा ठरला आणि मिकाने पत्नी म्हणून आकांक्षा पुरी हीची निवड केली. (mika singh and akanksha puri)

या शो मध्ये एकूण 12 इच्छुक वधू सामील झाल्या होत्या. त्यापैकी अंतिम फेरीत तीन वधू पोहोचल्या. आकांक्षा ही मिकाला आधीपासून ओळखते. ती त्याची मैत्रीण असून दोघेही एकमेकांना 12 वर्षे ओळखतात. या शो मध्ये तीची वाइल्ड कार्ड एंट्री झाली. आकांक्षाला तिच्या प्रेमाची जाणीव उशिरा झाल्याने ही वाइल्ड कार्ड एंट्री घेण्यात आली असेही बोलले गेले, मात्र आकांक्षाने हे पहिल्याच दिवशी सांगितले होते की, मिकाने मला रिजेक्ट केले तरी मी त्याच्या निर्णयाचा आदर करेन. पण आकांक्षाच्या एंट्रीने सर्व चित्रच पालटले. मिका आणि आकांक्षा याच्यातील मैत्रीचे बंध अधिक बहरले आणि आकांक्षा मिकाची जीवनसाथी बनली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT