Mika Singh On Jacqueline Fernandez And Jean Claude Van Demme photo Call Him Better Than sukhesh  Esakal
मनोरंजन

Mika Singh: "हा सुकेशपेक्षा लाखपटीनं...", मिकानं कुणाबाबत जॅकलीनला मारला टोमणा!

Vaishali Patil

गेल्या अनेक दिवसांपासून जॅकलिन फर्नांडिस ही सुकेश चंद्रशेखरसोबत सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कोणत्याही चित्रपटात दिसली नव्हती मात्र आता जॅकलिन फर्नांडिसने तिच्या आगामी हॉलिवूड प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना माहीती दिली आहे.

जॅकलिनने अॅक्शन स्टार जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांच्यानंतर आता जॅकलिन फर्नांडिस हॉलिवूड इंडस्ट्रीत एंट्री करणार असल्याने सर्वच लोकांनी तिचे कौतुक केले आहे.

तर दुसरीकडे गायक मिका सिंगने ही पोस्ट रिट्विट करत असं काही तरी लिहिलं की त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. त्या फोटोतील व्यक्ती सुकेश चंद्रशेखरपेक्षा चांगली असल्याचे मिकाने म्हटले आहे. त्यानंतर मिकाने ही पोस्ट डिलिट केली

जॅकलिन फर्नांडिसने शेअर केलेल्या पोस्टवर मिका सिंगने प्रतिक्रिया देणारी पोस्ट शेयर केली आहे. या फोटोत ती इटलीमध्ये जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबत पोज देताना दिसत आहे. पोस्ट शेअर करताना जॅकलीनने कॅप्शन लिहिले होते की, 'प्रख्यात व्हॅन डॅमसोबत! याची प्रतीक्षा करू शकत नाही!'

यावर प्रतिक्रिया देताना मिका सिंगने लिहिले की, 'तू खूप सुंदर दिसत आहेस, तो सुकेशपेक्षा खूपच चांगला आहे.' काही तासाच मिका सिंगची ही पोस्ट सोशल व्हायरल झाली आहे. मात्र त्यानंतर मिकाने लगेचच ती पोस्ट डिलिट केली आहे. मात्र त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

जॅकलिनच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच सोनू सूद आणि विजय राजसोबत 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ती 'वेलकम टू द जंगल'मध्येही दिसणार आहे. जॅकलीन शेवटची रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्ये दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT