mika singh 
मनोरंजन

मिका सिंह म्हणाला, 'गेल्या ८ महिन्यापासून मला...'

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रसिद्ध गायक मिका सिंहने कंगानावर निशाणा साधल्यापासून चर्चेत आहे. सोशल मिडियावर मिका सिंह सध्या खूप ऍक्टीव्ह आहे. त्याने 'सयोनी' या सिनेमासाठी एक 'पप्पी गाणं' गायलं आहे. त्याचं म्हणणं आहे की तो मोठ्या पडद्यावर रोमँटिक ऍक्शन सिनेमात हे गाणं पाहण्यासाठी उत्सुक आहे. 

मिका सिंहने या गाण्याबाबत सांगण्याआधी लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या अडचणींबद्दल खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की गेल्या ८ महिन्यांपासून त्याला कोणतही काम मिळालं नव्हतं. मला माहित आहे की माझ्यासारखे बरेच लोक असतील. मात्र मला ही देखील खात्री आहे की सगळं लवकरंच ठीक होईल. त्याने सांगितलं की या गाण्यासाठी सिनेमाच्या निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क केला तेव्हा सुरुवातीला मला हे जास्त पसंत पडलं नाही. मात्र जेव्हा मी हे गाणं तीन ते चार वेळा गुणगुणलं तेव्हा मला हे खूप मजेशीर वाटलं. यामध्ये काही द्विअर्थी शब्द देखील आहेत.

हे नवीन गाणं संगीतकार अनंत आणि अमनद्वारे रचलेलं आहे. मिका सिंहने सांगितलं की मला वाटतं एकुणच गाण्याला अतिशय छानप्रकारे शूट केलं गेले आहे. या सिनेमात तन्मय सिंह, मुसकान सेठी, राहुल रॉय, योगराज सिंह, उपासना सिंह मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्यात नितीन कुमार गुप्ता आणि अभय सिंघल यांनी अभिनीत केलं आहे.   

mika singh says i did not found work over last 8 months  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : पाकिस्तानने डाव साधला, भारताचा गडी भोपळ्यावर परतला! पहिल्याच षटकात मोठा धक्का

Shrikant Shinde: 'खुमखुमी असेल तर लोकसभेत आमच्यासमोर या’, श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईक यांना खुले आव्हान

नात्यांच्या हळव्या भावविश्वाला स्पर्श करणारे ‘माया’ चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला!

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

SCROLL FOR NEXT