Mika singh to Shipa Shetty viral kissing scene video  esakal
मनोरंजन

Viral Video : 'पप्पी दे पारुला ..', मिकापासून हॉलीवूडच्या रिचर्डपर्यत कॅमेऱ्यासमोर तोल सुटलेले महाभाग

गेल्या काही दिवसांत मनोरंजन विश्वातील त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mika singh to Shipa Shetty viral kissing scene video : टीव्ही मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या घडामोंडीकडे चाहत्यांचे नेहमीच लक्ष असते. अशातच काही सेलिब्रेटी बऱ्याचदा प्रसिद्धीसाठी जे काही करतात त्यामुळे ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांत मनोरंजन विश्वातील त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले होते.

मिका सिंग आणि राखी सावंत यांच्या तो किसिंगचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला होता. आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या राखीनं मिका सिंगवर देखील एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर एका कार्यक्रमा मध्ये मिका आणि राखीची भेट झाली. त्यात मिकानं कुणाचीही भीडभाड न ठेवता राखीला किस केले होते. त्यानंतर राखीला रडू कोसळले. आणि तिनं मिकाची पोलिसांकडे तक्रारही केली होती.

Also Read - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा असाच एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बिग ब्रदर रियॅलिटी शोमध्ये शिल्पा सहभागी झाली होती. त्यात शिल्पाला तिच्या रंगावरुन चिडवण्यात आले होते. यानंतर पुढे एका शोमध्ये ब्रिटिश अभिनेता रिचर्ड गॅरीनं तिला सर्वासमोर किस केलं होतं. तेव्हा ती गोष्ट शिल्पानं हलक्यात घेतली. मात्र जेव्हा तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले तेव्हा तिनं रिचर्डवर टीका केली होती. त्या प्रकरणानं शिल्पा चर्चेत आली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्घ अभिनेत्री आणि मॉडेल कश्मिरा शहा ही तिच्या पतीसोबत भर पार्टीत रोमँटिक अंदाजात दिसून आली होती. ती नशेत असल्याचे तिनंही सांगितले होते. यामुळे की काय तिनं आपल्या वागण्याचे स्पष्टीकरण नेटकरी आणि चाहत्यांना दिले होते त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले होते. कश्मिरानं तर धड चालताही येत नव्हते. याप्रसंगी तिनं पती कृष्णाला किस केले होते.

बिग बॉसची विजेती तेजस्विनी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यातील रोमान्स हा कुठेही सुरु होतो. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गोव्यातील एका पार्कमध्ये त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चाहत्यांनी देखील त्यांना फटकारले होते. तुम्ही आा लग्न करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे हे कळत नसेल तर लोकांची बोलणी खावीच लागतील. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी त्यांना दिल्या होत्या.

दृश्यममधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरननं तर मीडियासमोरच तिच्या पतीला किस केलं होतं. हे असं काही एकदाच झालेले नाही. यापूर्वी देखील ती तिच्या या रोमँटिक अंदाजामुळे ट्रोल झाली आहे. मात्र श्रियाला त्याचा काही फरक पडलेला नाही. श्रिया ही तिच्या अभिनयामुळे आणि बोल्डनेसमुळे ओळखली जाते. मात्र अनेकदा तिच्या हटक्या अंदाजाचा तिला फटका बसल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT